‘मॉर्निग वॉक’ला दणका, २५ वाहनेही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST2021-04-16T04:25:11+5:302021-04-16T04:25:11+5:30

कोल्हापूर : संचारबंदी काळात मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या ४८ जणांवर बुधवारी कारवाई केली. दिवसभरात एकूण ७८९ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. ...

25 vehicles seized in 'Morning Walk' | ‘मॉर्निग वॉक’ला दणका, २५ वाहनेही जप्त

‘मॉर्निग वॉक’ला दणका, २५ वाहनेही जप्त

कोल्हापूर : संचारबंदी काळात मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्या ४८ जणांवर बुधवारी कारवाई केली. दिवसभरात एकूण ७८९ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या २५ जणांची वाहनेही पोलिसांनी जप्तीची कारवाई केली.

संचारबंदी कालावधीत दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी पोलिसांचा शहर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मॉर्निंग वॉकसाठी सकाळी बाहेर पडलेल्यांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली. शहरातील चारही पोलीस ठाण्यांअंतर्गत मॉर्निंक वॉकसाठी बाहेर पडलेल्या ४८ जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. सकाळी पोलिसांना रस्त्यावर पाहून संबंधितांची तारांबळ उडाली. ‘विनाकारण फिरू नका’ असे वारंवार आवाहन करूनही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी गुरुवारी कडक पाऊल उचलले अशी २५ वाहने दिवसभरात पोलिसांनी थेट जप्त केली. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६४० जणांवर मोटार व्हेईकल ॲक्‍ट अंतर्गत कारवाई केली. विना मास्क फिरणाऱ्यांवर महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली. कारवाईची ही प्रक्रिया येथून पुढे अधिक तीव्र होणार आहे.

दिवसभरातील कारवाई

जप्त वाहने : २५

वाहतूक नियमांचे उल्लंघन :६४०

विना मास्क : ६८

प्रतिबंधात्मक कारवाई :०८

Web Title: 25 vehicles seized in 'Morning Walk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.