‘गडहिंग्लज’साठी २४७ अर्ज

By Admin | Updated: February 26, 2016 01:26 IST2016-02-26T00:38:28+5:302016-02-26T01:26:45+5:30

अखेरचा दिवस आज : शिंदे, शहापूरकर, संग्राम कुपेकर, अप्पी पाटील यांचे अर्ज दाखल

247 applications for 'Gadhinglj' | ‘गडहिंग्लज’साठी २४७ अर्ज

‘गडहिंग्लज’साठी २४७ अर्ज

गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशीअखेर एकूण २४७ अर्ज दाखल झाले. गुरुवारी एका दिवसात १२४ उमेदवारांनी १६३ अर्ज दाखल केले. आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.
जनता दलातर्फे माजी अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, विद्यमान संचालक बाळासाहेब मोरे, श्रीपती कदम, भीमराव पाटील, बाळासाहेब मोकाशी, प्रा. स्वाती कोरी व निर्मला मगदूम यांच्यासह शशिकांत चोथे, रमेश मगदूम, दत्ता मगदूम यांनी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादीतर्फे माजी संचालक बी. टी. पाटील, महाबळेश्वर चौगुले, सतीश पाटील, राजेश पाटील-औरनाळकर व प्रेमा मुन्नोळी यांनी अर्ज दाखल केले. अप्पी पाटील गटातर्फे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही गुरुवारी अर्ज दाखल केले.
शिवसेनेतर्फे संग्रामसिंह कुपेकर, एन. डी. कांबळे, आनंदा मटकर, संजय कांबळे, दिलीप माने, चंद्राबाई निलवे यांनी अर्ज दाखल केले. शहापूरकर गटातर्फे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील यांनी अर्ज भरला. हत्तरकी गटातर्फे वीरशैव बँकेचे संचालक सदानंद हत्तरकी, चंद्रशेखर पाटील, तमाण्णा पाटील यांनी अर्ज भरला. भाजपसह अन्य पक्षांच्या इच्छुकांचे अर्ज आज दाखल होणार आहेत.
...सांग माझ्या कानात..!
गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोण-कोणाबरोबर जाणार याची उत्सुकता गडहिंग्लजकरांसह संपूर्ण जिल्ह्याला आहे. संभाव्य आघाड्यांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष व गटांचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. उमेदवारी दाखल करण्याच्या निमित्ताने गडहिंग्लज येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये एकत्र आलेले माजी आमदार श्रीपतराव शिंदे व शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर यांच्यात अशा कानगोष्टी झाल्या.(प्रतिनिधी)

Web Title: 247 applications for 'Gadhinglj'