शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे, २४०० पदे रिक्त; कारभार कसा होणार मस्त!, कोल्हापूर जिल्हा परिषदेतील स्थिती 

By समीर देशपांडे | Updated: October 5, 2023 12:56 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत असणारी साडेबाराशे गावे, तेथील पाणी योजनेपासून ते शाळांपर्यंतची विकासकामे, रस्ते, गटारी ...

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत असणारी साडेबाराशे गावे, तेथील पाणी योजनेपासून ते शाळांपर्यंतची विकासकामे, रस्ते, गटारी करण्यापासून ते शेकडो कल्याणकारी योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी धडपडत आहेत. परंतु अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंतची तब्बल २३८३ पदे रिक्त असल्याने या विकासाला वेग येण्यावरही मर्यादा येत आहेत. यामध्ये १३८९ प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा समावेश आहे.

ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात बारा पंचायत समित्यांच्या माध्यमातून विकासकामे राबवली जातात. प्रत्येक गावातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण या सर्व व्यवस्थांची जबाबदारी जिल्हा परिषदेवर येते. अशातच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या कल्याणकारी योजना या शंभरच्यावर आहेत. अशातच दोन्ही शासनाकडून जाहीर होणारे महोत्सव, उत्सव, मोहिमा, अभियाने, रॅली, जगजागरण, स्वच्छता मोहिमा यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी पिचला आहे.अशा परिस्थितीमध्ये इतक्या कमी मनुष्यबळामध्ये विविध विकासकामे राबवत कोल्हापूर जिल्हा परिषद राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारांची मानकरी ठरली आहे. परंतु या रिक्त पदांचा ताण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर येत आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे जरी पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अनेक विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी दर शनिवारी जिल्हा परिषदेत कामात असलेले दिसतात. कारण, सुटीदिवशी बसल्यानंतरच विभागाच्या आवश्यक फाइल्सवर निर्णय घेता येतो. प्रलंबित कामे मार्गी लावता येतात, असा अनेक अधिकाऱ्यांचा अनुभव आहे.

रिक्त पदे अशी..

  • गट क्रमांक एकच्या अधिकाऱ्यांची पदे : ६०
  • गट क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांची पदे : ५४८
  • गट क्रमांक तीनच्या कर्मचाऱ्यांची पदे : १६४५
  • ड वर्गातील कर्मचाऱ्यांची पदे : १३०
  • अशी एकूण २३८३ पदे रिक्त

व्हीसीचा तगादाकोरोनानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठका सुरू झाल्या आणि आता तर त्याचे प्रमाण खूपच वाढले वाढले. कोणत्या विभागाचा कोणता वरिष्ठ अधिकारी कधी व्हीसी लावेल आणि त्याचा मेसेज व्हाॅट्सअॅपवर टाकेल, याची खात्री नसल्याने अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाचे नियोजनच करता येईना झाले आहे. आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता आणि दुसरीकडे विविध विभागांच्या वाढत्या तक्रारी यामुळे ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी वैतागले आहेत.

भरतीमुळे थोडा दिलासाजिल्हा परिषदेतील ७२८ कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ७ ऑक्टोबरपासून त्यासाठी परीक्षा सुरू होत आहेत. इतक्या जागा रिक्त असताना येत्या महिन्याभरात या जागा भरल्या गेल्या तर साहजिकच तो एक मोठा दिलासा ठरणार आहे.

‘आरोग्या’च्याच जागा रिक्तमाणसांच्या आणि जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डाॅक्टरांच्याच जागा अधिक संख्येने रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १५ जागा रिक्त असून, पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या तब्बल ५८ जागा रिक्त आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद