जिल्हा बँकेच्या यादीत २४० संस्था अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST2021-08-18T04:30:40+5:302021-08-18T04:30:40+5:30
(जिल्हा बँक लोगो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क, काेल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दाखल ८५०० संस्था प्रतिनिधींच्या नावांची छाननी ...

जिल्हा बँकेच्या यादीत २४० संस्था अपात्र
(जिल्हा बँक लोगो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क, काेल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दाखल ८५०० संस्था प्रतिनिधींच्या नावांची छाननी बँकेच्या पातळीवर पूर्ण झाली आहे. त्यामध्ये २४० संस्था अवसायनात, नोंदणी रद्द झाल्याचे आढळले असून ८२६० संस्थांची यादी सहकार विभागाकडे पाठविण्यात आली आहे. तालुका पातळीवर सहायक निबंधक या यादीची पुन्हा तपासणी करणार आहे.
जिल्हा बँकेच्या चार विविध गटांतून ८५०० संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव दाखल झाले होते. या यादीची छाननी करण्यासाठी सहकार विभागाने जिल्हा बँकेकडे पाठविली होती. बँकेच्या पातळीवर पोटनियमांनुसार त्याची छाननी करण्यात आली. त्यामध्ये अवसायनात काढलेल्या, नोंदणी रद्द झालेल्या यासह बँकेच्या पोटनियमांनुसार २४० संस्था मतदानासाठी अपात्र ठरल्या आहेत. बँकेने मंगळवारी ही यादी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे पाठविली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी तालुका पातळीवर यादीची छाननी करण्यासाठी पाठविल्या आहेत. तालुका पातळीवरून जिल्हा बँकेकडे पुन्हा यादी येणार असून त्यानंतर सोमवारी (दि. २३) बँक विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांच्याकडे यादी सादर करणार आहे. विभागीय सहनिबंधक ३ सप्टेंबरला प्रारुप यादी प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर १३ सप्टेंबरपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. हरकतीवर सुनावणी घेऊन २७ सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
हातकणंंगले तालुक्यातील सर्वाधिक संस्था
प्रक्रिया संस्था गटातून दोन संचालक निवडून जातात. या गटात ५४७ संस्था प्रतिनिधींचे ठराव आले आहेत. यामध्ये बहुतांशी संस्था हातकणंगले तालुक्यातील असून जिल्हा बँकेच्या छाननीत अपात्र ठरलेल्या २४० पैकी सर्वाधिक संस्था याच गटातील व तालुक्यातील आहेत.