शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अबब... कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत प्रभाग रचनेबद्दल २४ हजार हरकती

By समीर देशपांडे | Updated: October 29, 2025 16:29 IST

अंतिम रचना शुक्रवारी जाहीर : कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपालिका आणि नगरपंचायतींची प्रभाग रचना ३१ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. दरम्यान या रचनेवर जिल्ह्यातून तब्बल २३ हजार ८२० हरकती घेण्यात आल्याने याबाबत प्रशासन नेमका काय निर्णय घेणार, याकडे कार्यकर्त्यांसह नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आधी या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाला दिले होते. त्यानुसार पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नंतर नगरपालिका आणि त्यानंतर महापालिका निवडणुका घेण्याचे सुतोवाच नेत्यांकडून होत होते.दरम्यान मराठवाडा, विदर्भामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर राजकीय संदर्भ बदलले आहेत. अजूनही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा झालेली नाही. पुन्हा पाऊस सुरू झाल्यने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांचे लक्ष नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांकडे लागले आहे. यासाठी १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तोपर्यंत वरीलप्रमाणे हजारो हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. ७ नोव्हेंबरला मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता ३१ तारखेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या आहेत हरकती

  • विचित्र पद्धतीने प्रभाग फोडण्यात आले आहेत.
  • नागरिक वार्ड ६ मध्ये राहायला आहे आणि त्याचे मतदान वार्ड क्रमांक ७ मध्ये दाखवण्यात आले आहे.
  • संलग्न भाग वगळला आहे.
  • यामुळे आरक्षणातही बदल झाला आहे.

नगरपालिका, पंचायती आलेल्या हरकती

  • जयसिंगपूर नगरपालिका : ९८८२
  • शिरोळ नगरपालिका : २४९८
  • आजरा नगरपंचायत : २२१२
  • वडगाव नगरपालिका : १७८३
  • कुरूंदवाड नगरपालिका : १६४३
  • गडहिंग्लज नगरपालिका : १४४८
  • चंदगड नगर पंचायत : १३४४
  • हातकणंगले नगर पंचायत : ९८३
  • हुपरी नगरपालिका : ९२६
  • कागल नगरपालिका : ६७८
  • पन्हाळा नगरपालिका : २१४
  • मलकापूर नगरपालिका : १२४
  • मुरगुड नगरपालिका : ८५
  • एकूण २३,८२०

नगरपंचायतीचे प्रभाग चुकीच्या पद्धतीने फोडले आहेत. त्यामुळेच आजऱ्यासारख्या छोट्या नगरपंचायत कार्यक्षेत्रातूनही २२०० हून अधिक हरकती घेण्यात आल्या आहेत. - रशिद पठाण, आजरा

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipality Elections: 24,000 Objections Filed on Ward Structure

Web Summary : Kolhapur faces scrutiny as 23,820 objections flood ward formations for upcoming municipal elections. Focus shifts to administration's decision amid changed election schedules. Odd ward divisions, voter mismatches fuel concerns.