शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून महिन्यात २३५ विमानांचे टेकऑफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:51 IST

कोल्हापूर विमानतळ राहिले सर्वात व्यस्त

कोल्हापूर : मुंबई, हैदराबाद, बंगळुरू या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या कोल्हापूरविमानतळाचा वापर सध्या वाढला असून विधानसभा निवडणुकीत एका महिन्यात कोल्हापूर विमानतळावर आतापर्यंतचे सर्वाधिक २३५ विमानांचे टेकऑफ व लँडिंग झाले आहे. वाढणारी प्रवाशांची संख्या, सोयी सुविधा, नाईट लँडिंग यामुळे कात टाकणाऱ्या कोल्हापूर विमानतळाची ही राजकीय उड्डाणे विमानतळ किती बिझी आहे याची साक्ष देऊन गेले.विधानसभा निवडणुकीत प्रचारसभा, अर्ज भरणे, बैठका यासाठी देशभरातील सर्वच पक्षांचे नेते कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आले होते. हे नेते स्वतंत्र विमानाने कोल्हापुरात आले. काही नेत्यांनी हेलिकॉप्टरवरही जास्त भर दिला होता. त्यामुळे १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या एका महिन्यात २३५ विशेष विमानांचे कोल्हापूर विमानतळावर टेकऑफ अन् लँडिंग झाले आहे. कोल्हापूर विमानतळावरून नियमित रोज चार विमानांचे टेकऑफ तर चार विमानांचे लँडिंग होते.जवळपास एका आठवड्यात ५८ विमाने येथून ये-जा करतात. मात्र, त्या व्यतिरिक्त राजकीय नेते, उद्योजक यांचे विमाने, हेलिकॉप्टर या विमानतळावर सातत्याने उतरत असतात. लोकसभा निवडणुकीतही २७० विमानांची या विमानतळावरून ये-जा झाली आहे.एकाच दिवशी २८ विमानेविधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या एक दिवस आधी १७ नोव्हेंबरला कोल्हापूर विमानतळावर २८ इतक्या सर्वाधिक विमानांचे टेकऑफ अन लँडिंग झाले आहे. २० विशेष विमाने तर दैनंदिन ८ विमानांचा यात समावेश आहे. २०१८ पासून आतापर्यंत एका दिवशी इतक्या विमानांची प्रथमच ये-जा झाली. विशेष म्हणजे विमानतळ इतके बिझी असूनही सर्वच नेत्यांच्या विमानांना सोयीची वेळ दिल्याने त्यांच्या सभा वेळेत पार पडल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ