म्युकरमायकोसिसचे तीन जिल्ह्यांत २३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:10+5:302021-05-19T04:24:10+5:30
कोल्हापूर : म्युकरमायकोसिस आजाराचे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ रुग्ण आढळले आहेत. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक १३ रुग्णांची ...

म्युकरमायकोसिसचे तीन जिल्ह्यांत २३ रुग्ण
कोल्हापूर : म्युकरमायकोसिस आजाराचे कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ रुग्ण आढळले आहेत. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक १३ रुग्णांची नोंद असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या संसर्गावर उपचार करण्यासाठी आता येथील सीपीआरमध्ये ८ बेडचा नवा वॉर्ड मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १० रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील १३ पैकी शासकीय रुग्णालयात ४, तर खासगी रुग्णालयात ९ जणांवर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात तीन रुग्णांवर उपचार सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही.
या आजाराच्या रुग्णाला दैनंदिन १० हजार रुपयांची इंजेक्शन्स आवश्यक असून आता या इंजेक्शनची मागणी वाढली आहे.
कोट
कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. त्यांच्यावरील उपचाराची मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाली असून त्यानुसार उपचार सुरू आहेत. इंजेक्शन्सची मागणी नोंदवण्यात आली आहे.
डॉ. अजित लोकरे
विभागप्रमुख,
कान, नाक, घसा विभाग
राजर्षी शाहू महाराज छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.