शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

Kolhapur: 'बाळूमामा'ची दीड कोटींची २३ गुंठे जमीन पुन्हा देवस्थानलाच विकली; आदमापुरातील विश्वस्तांचा व्यवहार पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:53 IST

भक्तांची राज्य धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार 

शिवाजी सावंतगारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवस्थानाच्या विश्वस्त मंडळावर पुन्हा एकदा गंभीर आरोपांचा भडका उडाला आहे. देवस्थानासाठीच खरेदी केलेल्या जमिनीची पुन्हा वटमुखत्यारपत्र दाखवून तब्बल १ कोटी ६८ लाख २ हजार ५०० रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याची तक्रार भक्तांच्यावतीने राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे झाली असून यासह अन्य प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे.या व्यवहाराबाबत एका भक्ताने महसूल अधिकाऱ्यांकडेही जमिनीचा फेरफार करू नये अशी हरकत घेतली आहे. आदमापूर येथील गट नंंबर १९१ मधील २३ गुंठे जमीन देवस्थानच्या निधीतून देवस्थानसाठीच परंतु सचिव रावसाहेब वीराप्पा कोणकेरी यांच्या नावावर २०१५ ते २०१६ या कालावधीत घेतली आहे. त्यावेळीच ही जमीन देवस्थानच्या नावावर न घेता ती सचिवांच्या व्यक्तिगत नावे घेतली आहे. कोणकेरी यांनी ही जमीन सप्टेंबर २०२५ मध्ये प्रकाश पांडुरंग मांगले यांना वटमुखत्यारपत्राने विकत दिली. मांगले यांनी तीच जमीन बाळूमामा देवस्थानाला पुन्हा विकली. आणि त्याबदल्यात ३ सप्टेंबर २०२५ ला १ कोटी ६८ लाख २ हजार ५०० रुपये देवस्थानकडून स्वतःला घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तक्रार झाल्याने ग्रामस्थांनी विरोध केल्याने पैसे परत करण्यासाठी गडबड सुरू आहे. पण यातील काही कारभारी पैसे न देण्याच्या पवित्र्यात आहेत. दीड कोटींचा व्यवहार नजरचुकीतून कसा?’देवस्थान समितीने १ कोटी ६८ लाख रुपये कोणाच्या नावे आरटीजीएस केले..? ज्यांच्या नावावर आरटीजीएस केलेली रक्कम त्यांनी कोणाकोणाच्या खात्यात वर्ग केली की रोख दिली..? पुन्हा देवस्थानकडे पैसे वर्ग करण्यासाठी का हालचाली सुरू झाल्या आहेत..? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हा व्यवहार करण्यासाठी लक्ष्मणरेषा कशी पार करायची यासाठी मार्गदर्शन करणारे भीष्म कारभारी कोण आहेत, अशी चर्चा भक्तांत आहे.

ही घटना अनवधानाने घडली आहे. जमीन देवस्थानच्या नावावर केली जाणार असून या व्यवहारापोटी कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. - रावसाहेब कोणकेरी सचिव, बाळूमामा देवस्थान समिती, आदमापूर (ता. भुदरगड) 

बाळूमामा देवस्थानचीच जमीन देवस्थानलाच पुन्हा विकण्याचा प्रकार घडला आहे. आमच्यापर्यंत त्याबद्दलच्या तक्रारी आल्या आहेत. - धैर्यशील भोसले , अध्यक्ष, बाळूमामा देवस्थान समिती, आदमापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Balumama Trust Land Resold to Temple; Controversy Erupts

Web Summary : Admapur's Balumama temple trust faces allegations of reselling land originally bought for the temple, sparking controversy and prompting an inquiry into financial irregularities.