शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर लोकसभेसाठी २३ तर, हातकणंगलेत २७ उमेदवार रिंगणात; शेट्टींना मिळालं 'शिट्टी' चिन्ह

By पोपट केशव पवार | Updated: April 22, 2024 18:30 IST

विशेष म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात या निवडणुकीतील उमेदवारांची संख्या सर्वाधिक

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ४ जण तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ५ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे कोल्हापुरातून २३ उमेदवार रिंगणात असून हातकणंगलेत २७ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.  विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात आतापर्यंतच्या इतिहासात या निवडणुकीतील उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. गत निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात १५ तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात हाेते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २८ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यातील एक अर्ज छाननीत बाद झाल्याने २७ उमेदवरांचे अर्ज शिल्लक राहिले. सोमवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. यापैकी ४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने या मतदारसंघात २३ उमेदवार आपले नशिब आजमावणार आहेत. दरम्यान, या मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांचा अपक्ष अर्ज कायम राहिला आहे.दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी  ४ अर्ज छाननीत बाद झाल्याने ३२ अर्ज शिल्लक राहिले. यातील पाच जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने या मतदारसंघात ३२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. 

शेट्टींना पुन्हा मिळाली शिट्टीहातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना शिट्टी हे त्यांचे आवडते चिन्ह मिळाले. यापूर्वी २०१४ मध्ये याच चिन्हावर निवडणूक लढवित त्यांनी लोकसभा गाठली होती. गत लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी हेच चिन्ह मिळावे अशी मागणी केली होती. आता २०२४ च्या निवडणुकीत शिट्टी चिन्ह मिळण्याचा आग्रह  स्वाभिमानीने धरला होता. दुसऱ्या एका अपक्ष उमेदवाराने त्यावर दावा सांगितला. मात्र,  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वाभिमानीला त्यांच्या मागणीनुसार शिट्टी चिन्ह दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४