बेळगाव मनपा आयुक्तांना द्यावा लागणार २.२८ कोटींचा हिशोब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:42+5:302021-09-10T04:30:42+5:30
बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, पत्रकार प्रसाद सु प्रभू आणि पाच शेतकऱ्यांनी यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका ...

बेळगाव मनपा आयुक्तांना द्यावा लागणार २.२८ कोटींचा हिशोब
बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, पत्रकार प्रसाद सु प्रभू आणि पाच शेतकऱ्यांनी यासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. बेळगावचे सांडपाणी सुरळीतपणे वाहत जाऊन सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी अलरवाड ही जागा योग्य आहे. त्यासंदर्भात महानगरपालिकेने जागेची निवड करून भू-संपादन केले आणि अर्धवट कामही केले होते. त्यासाठी दोन कोटी २८ लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र पुन्हा हलगा येथील जमिनीवर सांडपाणी प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला. यामुळे नारायण सावंत, प्रसाद सु प्रभू आणि काही शेतकरी यांनी जनहित याचिका दाखल करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने यासंदर्भात अनेक सुनावण्या केल्या. त्या वेळी महानगरपालिकेने एकदाही उपस्थित राहून आपली बाजू मांडली नाही. या वेळी जनहित याचिका दाखल करणाऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी एकंदर भ्रष्ट कारभाराची माहिती न्यायालयासमोर दिली असून, न्यायालयाने मनपा आयुक्तांनी हजर होऊन त्यासंदर्भातील माहिती द्यावी, असे सांगितले आहे.