गडहिंग्लज बाजार समितीसाठी २२८ अर्ज

By Admin | Updated: July 7, 2015 01:34 IST2015-07-07T01:34:33+5:302015-07-07T01:34:33+5:30

उद्या छाननी : जागा १९; माघारीनंतरच चित्र स्पष्ट

228 applications for Gadhinglj market committee | गडहिंग्लज बाजार समितीसाठी २२८ अर्ज

गडहिंग्लज बाजार समितीसाठी २२८ अर्ज

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल असे साडेतीन तालुके कार्यक्षेत्र असणाऱ्या गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी तब्बल २२८ अर्ज दाखल झाले. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी उद्या, बुधवारी होणार आहे.
अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने सत्ताधाऱ्यांच्या बिनविरोधाच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.
यंदाही निवडणुकीतही सत्ताधारी आघाडीत गडहिंग्लजमधील कुपेकर-शिंदे-हत्तरकी व चव्हाण गट, आजऱ्यातील चराटी-शिंपी व आपटे गट, चंदगडमधील नरसिंगराव-भरमूअण्णा-गोपाळराव गट, तर कागलमधील मुश्रीफ-मंडलिक-विक्रमसिंह राजे गट सहभागी झाले. वाटणीला आलेल्या जागांप्रमाणे त्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, शिवसेना, भाजप व स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांसह गडहिंग्लजमधील अप्पी पाटील गट, संग्राम कुपेकर गट व शहापूरकर गटासह काँगे्रसच्या काही गटांनीदेखील अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: 228 applications for Gadhinglj market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.