शिवाजी विद्यापीठातील १४ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या २२६ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:50+5:302021-01-08T05:20:50+5:30

विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेश विभागाने विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दि. ७ डिसेंबरपासून सुरू केली. मात्र, एसईबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काही मराठा ...

226 vacancies for 14 postgraduate courses in Shivaji University | शिवाजी विद्यापीठातील १४ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या २२६ जागा रिक्त

शिवाजी विद्यापीठातील १४ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या २२६ जागा रिक्त

विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेश विभागाने विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दि. ७ डिसेंबरपासून सुरू केली. मात्र, एसईबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काही मराठा समाजातील संघटनांनी दि. १० डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर विद्यापीठाने १४ डिसेंबरपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. आतापर्यंत ॲग्रो केमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट, बायोटेक्नॉलॉजी, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, पर्यावरणशास्त्र, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गणित, मायक्रोबायोलॉजी, भौतिकशास्त्र, संख्याशास्त्र, प्राणीशास्त्र, बायोकेमिस्ट्री, एलएलएम या अभ्यासक्रमांच्या एकूण १०२७ जागांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वायसीआरडी अभ्यासक्रम (एमआरएस., एमबीए., एमटेक., एमएसडब्ल्यू), बी.लिब., एम.लिब., बी.जे., एम. जे., एम.ए. मास कम्युनिकेशन, बी.एस्सी- एम.एस्सी. नॅनो सायन्स., संगणकशास्त्र, एम.एस्सी. मेडिकल इनफॉर्मेशन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या २३२ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, २२६ जागा अद्याप रिक्त आहेत. त्यावरील प्रवेशासाठी मंगळवारी सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच यावेळेत ऑफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे. एम.ए.च्या विविध नऊ अभ्यासक्रम आणि एम. कॉम. अभ्यासक्रमाची ४९५ इतकी प्रवेश क्षमता आहे. त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

प्रतिक्रिया-

विद्यापीठातील बहुतांश विभागांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या विभागांमधील जागा रिक्त आहेत. त्यांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या अभ्यासक्रमांचे वर्ग हे शासन आदेशानुसार सुरू केले जातील.

-डॉ. पी. एस. पाटील, प्र-कुलगुरू

चौकट

जानेवारीअखेर प्रक्रिया पूर्ण

रिक्त जागांवरील आणि एम.ए., एम.कॉम. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. या प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असल्याची माहिती पदव्युत्तर प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ. पी. एस. पांडव यांनी दिली.

Web Title: 226 vacancies for 14 postgraduate courses in Shivaji University