शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
2
विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत; लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार?
3
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
4
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
5
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
6
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
7
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
8
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
9
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
10
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
11
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
12
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
14
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
15
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
16
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"
17
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई!
18
निवडणुकीत मराठी मतं मिळाली नाहीत? उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपला अजूनही..."
19
"हॅलो फ्रॉम Melodi टीम", जॉर्जिया मेलोनी आणि PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली...
20
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचे 'मेलोडी टीम...' सोशल मीडियावर ट्रेंड; PM मोदींनी दिली अशी रिअ‍ॅक्शन

कोल्हापुरातील प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर)मध्ये २२ कनिष्ठ निवासी पदे भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 6:03 PM

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) २२ कनिष्ठ निवासी पदे या महिन्याअखेर भरण्यात येणार आहेत. सध्या असलेल्या कनिष्ठ निवासी-एक यांची मुदत ३१ आॅक्टोबरला संपणार आहे.

ठळक मुद्देसीपीआरमध्ये २२ कनिष्ठ निवासी पदे भरणारशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती 

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) २२ कनिष्ठ निवासी पदे या महिन्याअखेर भरण्यात येणार आहेत. सध्या असलेल्या कनिष्ठ निवासी-एक यांची मुदत ३१ आॅक्टोबरला संपणार आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारित ‘सीपीआर’ रुग्णालय येते. प्रामुख्याने बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी), शस्त्रक्रिया विभाग, आदी ठिकाणी कनिष्ठ निवासी कार्यरत आहेत. अर्जदार हा किमान एम. बी. बी. एस. उत्तीर्ण व एम. एम. सी.चा कायमस्वरूपी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

एम. बी. बी. एस व डी. एन. बी.च्या उमेदवारांनी त्यांच्या विभागप्रमुखांमार्फत अर्ज सादर करावेत. कनिष्ठ निवासी-एक या पदासाठी २० आॅक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे, तर २५ ला मुलाखती अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर हे अधिष्ठाता कार्यालयात घेणार आहेत.कनिष्ठ निवासी हे पद सहा महिन्यांसाठी असणार आहे. यासाठी वयाची कोणतीही अट नाही आहे. जनऔषध वैद्यकशास्त्र (पी. एस. एम) विभागात सर्वाधिक चार, तर जीवरसायनशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र या विभागांत प्रत्येकी तीन आणि शरीररचनाशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, क्ष-किरणशास्त्र, आदी ठिकाणी प्रत्येकी दोन, छाती व क्षयरोगशास्त्र, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र, मनोविकृतीशास्त्र, आदी विभागात प्रत्येकी एक अशी एकूण २२ पदे भरण्यात येणार आहेत.

यासाठी वैद्यकीय शिक्षण यांची मंजुरी घेण्यात आली आहे. कनिष्ठ निवासी पदांची सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर संबंधिताला पुन्हा कनिष्ठ निवासी पदाला अर्ज करता येतो, असे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर