कुंभोजमध्ये २१ नळ कनेक्शन तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:58+5:302021-03-26T04:23:58+5:30
कुंभोज : महिन्याभराच्या गांधीगिरी मार्गाने सुरू असलेल्या थकीत घरफाळा व पाणीपट्टी वसुलीस मिळणारा जेमतेम प्रतिसाद पाहत कुंभोज ग्रामपंचायतीच्या ...

कुंभोजमध्ये २१ नळ कनेक्शन तोडले
कुंभोज : महिन्याभराच्या गांधीगिरी मार्गाने सुरू असलेल्या थकीत घरफाळा व पाणीपट्टी वसुलीस मिळणारा जेमतेम प्रतिसाद पाहत कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारपासून वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली. त्यात पहिल्या दिवशी एकवीस नळजोडण्या तोडण्यात आल्या. धडक कारवाईमुळे एका दिवसात दोन लाख पंचवीस हजार रूपयांची वसुली झाली. कारवाईचा धसका घेतला असून नियमित कर भरणाऱ्या नागरिकांमधून ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी हाती घेतलेल्या धडक मोहिमेचे स्वागत होत आहे.
घरफाळा तसेच पाणीपट्टी पोटी चालू व थकीत रक्कम पावणेतीन कोटींवर पोहचली असून ग्रामपंचायतीची महावितरणची वीजबिल थकबाकी पंचावन्न लाखांवर गेली आहे. महावितरणची संभाव्य कटू कारवाई टाळण्यासाठी गेले महिनाभर सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी स्वतः प्रत्येक थकबाकीदाराच्या नियमितपणे घरापर्यंत जाऊन गांधीगिरीने वसुलीसाठी कंबर कसली आहे. परिणामी तुलनेत वसुलीत वाढ झाली . नागरिकांनी थकीत घरफाळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे तसेच ग्रामविकास अधिकारी ए. एस कठारे यांनी केले.
२५ कुंभोज नळजोडणी
कुंभोज ता. हातकणंगले येथे थकीत घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने नळ कनेक्शन तोडण्याची आजपासून धडक मोहीम राबविण्यात आली.