विवेक पतसंस्थेस २१ लाख २५ हजार नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:22 IST2021-04-18T04:22:26+5:302021-04-18T04:22:26+5:30
संस्थेच्या ठेवी १७ कोटी असून १२ कोटी कर्जे दिली आहेत. १० टक्के लाभांश दिला आहे. सभासद कर्जदार मयत झाल्यास ...

विवेक पतसंस्थेस २१ लाख २५ हजार नफा
संस्थेच्या ठेवी १७ कोटी असून १२ कोटी कर्जे दिली आहेत. १० टक्के लाभांश दिला आहे. सभासद कर्जदार मयत झाल्यास कर्ज रकमेच्या प्रमाणात २५००० पर्यंत कर्जात सवलत देण्याचा ठराव सभेत झाला. सभासदांची १० वी, १२ वीची गुणवंत मुले, आदर्श शिक्षक हरिश्चंद्र गायकवाड, कोविडयोद्धा डॉ. संदीप मोहिते, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड यांचा सत्कार झाला.
सभेस उपाध्यक्ष वसंतराव विभुते, संचालक शाहू कांबळे, अतुल कुलकर्णी, राजेंद्र खारकांडे, शंकरराव साळोखे, उदय शेटे, सयाजी वाघमोडे, डॉ. भाग्यश्री मोहिते, सुजाता कार्वेकर, शिवाजी वाघमोडे, सचिव सुभाष कार्वेकर, अमोल कुलकर्णी उपस्थित होते.
फोटो : १७ अंबप विवेक संस्था
ओळी : अंबप (ता. हातकणंगले) येथील विवेक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या १८ व्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष संजय सूर्यवंशी.