वृध्द महिलेचे २० हजारांचे बोरमाळ चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST2021-01-25T04:24:57+5:302021-01-25T04:24:57+5:30
: मुलगीला भेटायला जाणाऱ्या वृध्द महिलेच्या गळ्यातील २० हजार किमतीचे अर्धा तोळे सोन्याची बोरमाळ एसटीतून चोरीस गेल्याची घटना आज ...

वृध्द महिलेचे २० हजारांचे बोरमाळ चोरीस
: मुलगीला भेटायला जाणाऱ्या वृध्द महिलेच्या गळ्यातील २० हजार किमतीचे अर्धा तोळे सोन्याची बोरमाळ एसटीतून चोरीस गेल्याची घटना आज आजरा तालुक्यात घडली. याबाबतची फिर्याद सोनाबाई शंकर मुगळे ( वय ६०, रा. हासूर, ता. कागल ) यांनी आजरा पोलिसात दिली आहे. सोनाबाई मुगळे या आज दुपारी मेढेवाडी ( ता.आजरा ) येथे असणाऱ्या मुलगीला भेटायला उत्तूर ते आजरा एसटीने जात होत्या. खेडे फाट्याला आलेनंतर त्यांना आपल्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ नसल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड करून कंडक्टरला याची माहिती दिली. चालकाने गाडी थेट पोलीस स्टेशनला आणली. एसटीतील प्रवाशांकडे चौकशी केली, पण बोरमाळ मिळाली नाही. बोरमाळमध्ये सोन्याचे १०१ मणी असून अधिक तपास पो.हे.काॅ. चेतन घाटगे करीत आहेत.