पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांसाठी २० हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:27 IST2021-05-07T04:27:27+5:302021-05-07T04:27:27+5:30
कोल्हापूर : पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांसाठी २० हजार डोस उपलब्ध झाले असून शुक्रवारी ...

पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांसाठी २० हजार डोस
कोल्हापूर : पंचेचाळीस वर्षांवरील नागरिकांसाठी २० हजार डोस उपलब्ध झाले असून शुक्रवारी सकाळी ११ नंतर ते लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार आहेत. दुसरा डोस घेणाऱ्यांना अर्थातच प्राधान्य देण्यात येणार आहे.
गुरुवारी दिवसभरामध्ये १९६७८ जणांना लस देण्यात आली. यामध्ये ५९३९ जणांना पहिला, तर १३ हजार ७३९ जणांना दुसरा डोस देण्यात आला. संध्याकाळी केंद्र सरकारकडून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी २० हजार डोस उपलब्ध झाले असून ते शुक्रवारी सकाळी नऊ वाजता वितरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे ११ नंतर लसीकरण सुरू होईल. उपलब्ध लसीपैकी ७० टक्के लस ही दुसऱ्या डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना देणे बंधनकारक केल्याने शुक्रवारी दुसऱ्या डोसचे लसीकरण वाढले आहे.