शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

अनाथ मुलांना मासिक दोन हजार देणार : मंत्री मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 13:20 IST

लवकरच राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या समित्यांची घोषणा होणार

कागल : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींची मासिक पेन्शन पोस्टल बॅंकेद्वारे घरपोच करण्याचा निर्णय विशेष सहाय्य विभागाने घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहीती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. निरीक्षण गृहात राहणाऱ्या १८ वर्षांवरील मुलीनां लग्न होईपर्यंत, तसेच आईवडील नसणाऱ्या अनाथ मुलांना मासिक दोन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णयही शासन घेणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.कागल तालुक्यातील या योजनेत नव्याने पात्र झालेले लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वाटप, तसेच केडीसीसी बॅंकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थींना कर्जमंजुरी पत्र वाटप, अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने, तहसीलदार जितेंद्र इंगळे, नायब तहसीलदार सूर्यवंशी काकासाहेब सावडकर, ज्योती मुसळे, मोरे, राजु माने आदी मान्यवर आदी मान्यवर उपस्थित होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेत जास्तीत जास्त लाभार्थींचा समावेश व्हावा. यासाठी नियमामध्ये बदल करून तसा प्रस्तावित आर्थिक अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस याच्यांसमोर सादर केला आहे. स्वागत प्रास्ताविक भय्या माने यांनी केले.

अध्यक्षपदी भय्या मानेंचे नाव जाहीर..मंत्री मुश्रीफ म्हणाले की, लवकरच राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या समित्यांची घोषणा होणार आहे. कागल तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना शिंदे गट या तीन पक्षांचे सदस्य या समितीत असतील. त्यांची नावे काय येतील ते येतील, पण अध्यक्षपदासाठी भय्या माने यांचे नाव निश्चित झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ