शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रात होणार २००० कोटींची गुंतवणूक, राज्यभरातील १०४ उद्योजकांनी घेतले भूखंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:36 IST

कोरोनामुळे या उद्योजक, कंपन्यांना भूखंडावर इमारत विकास, उद्योगांची सुरुवात करण्यात काही अडथळे निर्माण झाल्याने त्यांची पाऊले थांबली. आता उद्योगचक्र पूर्वपदावर आल्याने त्यांनी उद्योग सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : देश-परदेशातील नव्हे, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील उद्योजक कोल्हापुरात १९१८ कोटींची गुंतवणूक करणार आहेत. या गुंतवणुकीच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी गेल्या दीड वर्षांत जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये एकूण १०४ भूखंड घेतले आहेत. त्यांनी उद्योग सुरू केल्यानंतर ७००४ जणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील औद्योगिक क्षेत्रात गेल्या दीड वर्षांत किती उद्योजकांनी पाऊले टाकली ते ‘लोकमत’ने जाणून घेतले. कुशल मनुष्यबळ, चांगले वातावरण, औद्योगिक परंपरेमुळे कोल्हापुरात उद्योग, व्यवसायाचा विस्तार, नवी सुरुवात करण्यास इच्छुक असलेल्या उद्योजकांचे प्रमाण अधिक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी अधिक आहे.जानेवारी २०२१ पासून जुलै २०२२ पर्यंत एमआयडीसी विभागाने विविध उद्योजकांना शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले, गडहिंग्लज, हलकर्णी या एमआयडीसींमध्ये १०४ भूखंडांचे वाटप केले आहे. त्यात कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, आदी जिल्ह्यांतील उद्योजकांचा समावेश आहे. कोरोनामुळे या उद्योजक, कंपन्यांना भूखंडावर इमारत विकास, उद्योगांची सुरुवात करण्यात काही अडथळे निर्माण झाल्याने त्यांची पाऊले थांबली. आता उद्योगचक्र पूर्वपदावर आल्याने त्यांनी उद्योग सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.भूखंड घेतलेल्यांपैकी तीन कंपन्यांनी कागल-पंचतारांकित एमआयडीसीत बांधकामाचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यात साऊंड कास्टिंग, सुनील प्लास्टिक, डेल्टा इरिगेशन एलएलपी यांचा समावेश आहे. या कंपन्यांद्वारे २२५ कोटींची गुंतवणूक आणि १ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. येत्या दोन वर्षांत टप्प्या-टप्याने या नव्या उद्योगांची सुरुवात होईल.

नव्या तीन ‘एमआयडीसी’ होणारजिल्ह्यातील करवीर, राधानगरी, शिरोळ या तालुक्यांमध्ये नव्या तीन एमआयडीसी होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया एमआयडीसी विभागाने सुरू केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड मागणी करणाऱ्या उद्योजकांची संख्या वाढत आहे. त्यात राज्यभरातील उद्योजक आहेत. त्यांना भूखंड आणि अन्य सुविधा पुरविण्यासाठी आमचा वरिष्ठ कार्यालय, शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. -राहुल भिंगारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी कोल्हापूर

सध्याचे औद्योगिक क्षेत्र दृष्टिक्षेपात...

एमआयडीसी  - उद्योगांची संख्याशिरोली              १०००गोकुळ शिरगाव     ८००शिवाजी उद्यमनगर  ८५०कागल-हातकणंगले ४५०

टॅग्स :kolhapurकोल्हापूर