शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Bandh: कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात २० गावांत आज बंद; कृती समितीचा मंत्री आबिटकर, मुश्रीफांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:45 IST

..तर निवडणुकांवर बहिष्कार

कोल्हापूर : ज्यांच्या तालुक्यातील एक गावही हद्दवाढीत जात नाही, असे नेते हद्दवाढीचे समर्थन करत आहेत. आम्हाला विश्वासात न घेता हद्दवाढ केली तर त्याची किंमत मोजावी लागेल, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये, असा इशारा हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आज, मंगळवारी वीस गावे बंद ठेवून हद्दवाढीला विरोध करणार असल्याचेही त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.हद्दवाढ विरोधी समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण म्हणाले, सोयी-सुविधा मिळत नाहीत म्हणून कोल्हापूरचे नागरिक लोकप्रतिनिधींच्या नावाने रोज शंख करत आहेत. कोणाच्या तरी हट्टापायी हद्दवाढीचा घाट घातला असून, तो हाणून पाडू. प्रसंगी न्यायालयात जाऊन ग्रामीण जनतेची ताकद दाखवू.गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील म्हणाले, आमच्या गावांच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन केले, पण गेल्या आठ वर्षात एक रुपयाचा निधीही दिला नाही. चार-पाच गावे हद्दवाढीत घेऊन इंग्रजांसारखी तोडा आणि फोडाची निती कोणी अवलंबत असेल तर रस्त्यावरच्या संघर्षाला तयार राहा. पालकमंत्र्यांकडे दोनदा भेटीची वेळ मागितली, पण त्यांनी दिली नाही. ग्रामीण पदाधिकाऱ्यांना हलक्यात घेऊ नका, आमचीही ताकद दाखवू. यावेळी बालिंगेचे सरपंच अजय भवड, संग्राम पाटील, आदी उपस्थित हाेते.

‘कागल’ला घेऊन हद्दवाढ कराज्या नेत्यांचा हद्दवाढीबाबत आग्रह आहे, त्यांनी जरा उपनगरात जाऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत. हद्दवाढ केल्याचे श्रेय महापालिका निवडणुकीत घेण्यासाठी ग्रामीण जनतेला बळी देणार असाल तर याद राखा. हद्दवाढ करायची असेल तर पहिल्यांदा ‘कागल’ला घ्या, असे वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले यांनी सांगितले...तर निवडणुकांवर बहिष्कारकोणत्याही परिस्थितीत एक इंचही जमीन महापालिकेला देणार नाही. पहिल्या टप्प्यात चार-पाच गावे घेऊन आमच्यात फूट पाडण्याचा उद्योग नेत्यांनी करू नये. शासनाने चुकीचा निर्णय घेतला तर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडेकर यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकरHasan Mushrifहसन मुश्रीफ