शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत मतमोजणीसाठी २0 टेबलना मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:53 AM

२० टेबलांवर मतमोजणी करण्यासाठी परवानगी दिल्याने टेबलसंख्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहाने वाढल्याने मतमोजणी प्रक्रिया वेगाने करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण १२० टेबल लागणार आहेत.

ठळक मुद्देजिल्हा निवडणूक यंत्रणेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून मान्यदोन मतदारसंघांसाठी १२० टेबल लागणार

कोल्हापूर : कोल्हापूरहातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांत मतदारसंघ व मतदारसंख्या जास्त असल्याने १४ ऐवजी २० टेबलांवर मतमोजणी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. त्याला गुरुवारी निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याचे कळविले आहे. या निर्णयामुळे टेबलसंख्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहाने वाढल्याने मतमोजणी प्रक्रिया वेगाने करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण १२० टेबल लागणार आहेत.येत्या २३ मे रोजी मतमोजणी आहे. ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटवरील मते रॅँडम पद्धतीने मोजली जाणार आहेत. तथापि कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही मतदारासंघांत राज्यातील उच्चांकी मतदान आणि मतदारसंघांची संख्या जास्त असल्याने अंतिम निकाल वेळेत मिळण्यासाठी पूर्वीची १४ टेबलांची रचना अपुरी पडत होती. निवडणूक विभागाने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे टेबल वाढविण्यासंबंधी मागणी केली. गुरुवारी निवडणूक आयोगाने कोल्हापूर, हातकणंगलेसह मावळ, पनवेल, चिंचवड मतदारसंघांतही जादा टेबल लावण्यास मान्यता दिली आहे.या निर्णयामुळे या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी ६० याप्रमाणे १२० टेबल लागणार आहे. त्यात व्हीव्हीपॅटच्या स्वतंत्र टेबलांची आणखी भर पडणार आहे. त्यामुळे एका मतदारसंघात प्रत्येकी २० टेबल असले तरी त्यात व्हीव्हीपॅटसह निरीक्षकांच्या दोन टेबलची भर पडून ती २३ इतकी होणार आहे.

साधारणपणे दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल, असा अंदाज गृहीत धरून ही टेबलसंख्या वाढवण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे; पण व्हीव्हीपॅटच्या स्वतंत्र मोजणीमुळे आणखी कालावधी लागणार असल्याने अंतिम निकाल लांबण्याचीच चिन्हे दिसत आहेत.

‘लोकमत’चे वृत्त खरे ठरलेमतमोजणीसाठी २० टेबलची गरज लागणार असल्याने तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले. ८ मेच्या अंकात प्रस्ताव पाठविल्याचे वृत्त दिले, तर १४ मेच्या अंकात २० टेबलांवरच मतमोजणी होणार, असे वृत्त सर्वप्रथम दिले. निवडणूक आयोगाने गुरुवारी हा प्रस्ताव मान्य केल्याने ‘लोकमत’च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.

तयारी निकाल ऐकविण्याचीयेत्या २३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतमोजणीचा कल लवकरात लवकर कळावा म्हणून मोजणी केंद्राबाहेर निवडणूक विभागातर्फे ध्वनिक्षेपक लावण्यास सुरुवात झाली आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेcollectorजिल्हाधिकारी