शाहूवाडी तालुक्यात कोरोनाचे नवे २० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST2021-04-25T04:25:10+5:302021-04-25T04:25:10+5:30

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात येळाणे, बांबवडे, मलकापूर, भाडळे, शाहूवाडी, कडवे, सोनवडे, शिवारे, कापशी,भेंडवडे-प्रत्येकी एक,सरूड-दोन,ओकोली-तीन व कोळगाव-पाच अशा मिळून ...

20 new corona patients in Shahuwadi taluka | शाहूवाडी तालुक्यात कोरोनाचे नवे २० रुग्ण

शाहूवाडी तालुक्यात कोरोनाचे नवे २० रुग्ण

मलकापूर :

शाहूवाडी तालुक्यात येळाणे, बांबवडे, मलकापूर, भाडळे, शाहूवाडी, कडवे, सोनवडे, शिवारे, कापशी,भेंडवडे-प्रत्येकी एक,सरूड-दोन,ओकोली-तीन व कोळगाव-पाच अशा मिळून २० रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. ठमकेवाडीतील ४७ वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला.

जानेवारीपासून आज अखेर १८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.गेल्या चार महिन्यांत सरूड येथे २६ तर मलकापुरात १८ रुग्णांची संख्या पोहोचली आहे.

ओकोली, चरण, कापशी,उचत,कोळगाव,मोळावडे,बांबवडे,आंबा,केर्ले आदी ६४ गावातच कोरोनाचे रुग्ण- सातत्याने वाढत आहेत.

३४६ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत . करंजोशी येथील अॕल्फोन्सा स्कूल, पेरिडमधील कोविड सेंटर व होम क्वारंटाईन व खासगी रुग्णालय असे २४२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी व आरोग्य सहायक सुभाष यादव यांनी दिली.

Web Title: 20 new corona patients in Shahuwadi taluka