शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजरा येथे टेम्पोसह २० लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:27 IST

Excise Department Liquer kolhapur- टेम्पोच्या मागील बाजूस कप्पा करून त्यातून मद्याची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचा प्रकार गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. या विभागाने सापळा रचून आजरा येथे एस.टी. स्टँडसमोर ही कारवाई केली.

ठळक मुद्दे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई वाहनात कप्पा करून मद्य तस्करी

कोल्हापूर : टेम्पोच्या मागील बाजूस कप्पा करून त्यातून मद्याची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचा प्रकार गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. या विभागाने सापळा रचून आजरा येथे एस.टी. स्टँडसमोर ही कारवाई केली. या कारवाईत पथकाने सहा आसनी टेम्पो, व विदेशी मद्यसाठा असा सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित टेम्पोचालक ओंकार बळीराम मुळे (२३, रा. वडगाव सिद्धेश्‍वर, उस्मानाबाद) याला अटक केली.राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, आजरा परिसरातून विदेशी मद्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. या पथकाने गुरुवारी आजरा गावात एस.टी. स्टँडसमोर एक टेम्पो पकडला. त्याची तपासणी केली असता टेम्पोच्या मागील बाजूस विशिष्ट कप्पा करून त्यात विदेशी मद्याचा साठा लपवल्याचे उघडकीस आले.

विदेशी मद्य कोणाच्या निदर्शनास येऊ नये यासाठी प्लास्टिक ट्रेचा वापर करण्यात आला होता. पथकाने संशयित ओंकार मुळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विदेशी मद्य व वाहनासह २० लाख ९८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या मद्याचा मूळ मालक व पुरवठादाराचा पथक कसून शोध घेत आहे.

ही कारवाई उपअधीक्षक बी. आर. चौगले, निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, सुहास वरुटे, कर्मचारी सुखदेव सिद, प्रदीप गुरव, दीपक कापसे, मंगेश करपे, रवींद्र सोनवणे यांनी कारवाई केली.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागliquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूर