हिरवे कुटुंबीयांकडून २० मुली शिक्षणासाठी दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:29 IST2017-10-17T00:29:28+5:302017-10-17T00:29:28+5:30

हिरवे कुटुंबीयांकडून २० मुली शिक्षणासाठी दत्तक
लोकमत न्यूज नेटवर्क
देवाळे : ‘लेक वाचवा देश वाचवा’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अशा घोषणा सरकारी यंत्रणेपासून ते सामाजिक व स्वयंसेवा संस्थांच्या कार्यक्रमात ऐकू येतात; पण मुलगीबाबत जनजागृतीचे फलक न उभारता स्त्री जन्माचे स्वागत करून तिच्या नामकरण समारंभाचा थाटमाट न करता त्या दिवशी तब्बल २० मुली शिक्षणासाठी दत्तक घेऊन समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.
पैजारवाडी गावचे उपसरपंच उमेश ऊर्फ सागर हिरवे हे आपले आजोबा शिक्षणमहर्षी पांडुरंग हिरवे (गुरुजी) यांच्या विचारांचा वारसा घेऊन नातू उमेश हिरवे यांनी हिरवे गुरुजींच्या समाजकार्याचा वसा पुढे चालवत दीपाली यांच्या पोटी जन्मलेल्या मुलीचे मोठ्या आनंदाने स्वागत करून नामकरण कार्यक्रमावर अनावश्यक खर्च न करता पैजारवाडी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना पेन- वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता तिसरी ते पाचवीमध्ये शिकत असलेल्या २० मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन खºया आर्थने स्त्री जन्माचे स्वागत केल्याने कौतुकाची बाब होत आहे.
पं.पु. चिले महाराजांचे परमभक्त ओम चैतन्य गुरुमाउली यांनी मुलीचे नामकरण करून आशीर्वाद दिला. या नामकरण कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या संचालिका उदयानी साळुंखे यांनी हिरवे दाम्पत्याचे कौतुक केले. वंशाला मुलगाच पाहिजे, अशी मानसिकता बाळगणाºयांच्या डोळ्यांत या परिवाराने झणझणीत अंजन घातले आहे. मुलगा-मुलगी एकसमान मानून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात जनजागृती होऊन समाजप्रबोधन होईल, असे मत व्यक्त केले. बी. के. घोसाळकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी सरपंच दीपाली साठे, अनिल कामिरे, सागर हिरवे, चंद्रशेखर तांदळे, रणखंबे, मुख्याध्यापक विवेक देशपांडे, सर्व अध्यापक, ग्रामस्थ, आदी उपस्थित होते.