निपाणी तालुक्यातील २ बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST2021-07-22T04:17:18+5:302021-07-22T04:17:18+5:30
निपाणी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निपाणी तालुक्यातील दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत जत्राट ...

निपाणी तालुक्यातील २ बंधारे पाण्याखाली
निपाणी :
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निपाणी तालुक्यातील दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत जत्राट भिवशी व भोजवाडी कुन्नूर हे दोन बंधारे पाण्याखाली गेले होते. पावसाचा जोर असाच राहिला तर अन्य चारही बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून निपाणी तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. या संततधार पावसामुळे वेदगंगा व दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. नदीवर असलेला जत्राट बंधारा व भोजवाडी कुन्नूर बंधारा बुधवारी सायंकाळपर्यंत पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. पावसाचा जोर असाच राहिला तर अन्य बंधारे पाण्याखाली गेले.
फोटो जत्राट : बुधवारी सायंकाळी जत्राट बंधारा पाण्याखाली गेला.