शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या वारणानगर शाखेत २.८६ कोटींचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:30 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर (ता. पन्हाळा) शाखेत शाखाधिकारी तानाजी पोवार व लिपिक मुकेश पाटील यांनी ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर (ता. पन्हाळा) शाखेत शाखाधिकारी तानाजी पोवार व लिपिक मुकेश पाटील यांनी संगनमताने ओव्हर ड्राफ्टची (ओडी) बोगस कर्ज प्रकरणे करत तब्बल दोन कोटी ८६ लाखांचा अपहार केला आहे. ‘ओडी’चे अधिकार शाखाधिकाऱ्यांना दिले आहेत, त्याचा गैरवापर करत दोघांनी हा डल्ला मारला असून, त्यांचे निलंबन करण्याऐवजी केवळ कामावर येण्यास मज्जाव केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखांत प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांसह इतर शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार होतो. बँकेच्या धोरणानुसार जमा होणाऱ्या रोख पगारावर बारा पट ओडी दिली जाते. वारणानगर शाखेत लिपिक मुकेश पाटील व शाखाधिकारी तानाजी पोवार यांनी सुमारे ३० हून अधिक खात्यातून परस्पर ‘ओडी’ उचलली आहे. त्यातील एका खातेदाराला कर्ज उचल केल्याचा मेसेज गेल्याने हे बिंग फुटले. संबंधितांनी शाखेत चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. बँक प्रशासनाने संबंधित प्रकरणाची चौकशी केली असता यामध्ये सुमारे दोनन कोटी ८६ लाखांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे.ओडी देत असताना संबंधित कर्जदाराकडून स्टॅम्पवर हमीपत्र घ्यावे लागते. हमीपत्र दिल्यानंतर पैसे मिळतात. हमीपत्राशिवाय कर्ज प्रकरणे दिल्याचे प्राथमिक तपासणीत उघड झाले आहे. ‘वारणानगर’ शाखेतील अपहारानंतर केडीसीसीच्या सर्वच शाखांतील ‘ओडी’ प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक