शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पहिले कर्ज थकले, दुसरे घेताना १९ लाखांना गंडले; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:46 IST

इचलकरंजी : फौंड्री व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून १९ लाख ५५ हजार ६२० रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना ...

इचलकरंजी : फौंड्री व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून १९ लाख ५५ हजार ६२० रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली. त्यांना येथील न्यायालयासमोर हजर केले असता २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत रंजना बांद्रे (रा. नेर्ली, ता. करवीर) यांनी तक्रार दिली आहे.अर्चना दिगंबर पाटील (रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर कोल्हापूर), अमोल अरुण काटे (रा. पारिजात सोसायटी, इचलकरंजी) आणि अमर त्रिभुवन मोदी (रा. हडपसर-पुणे. सध्या रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रंजना बांद्रे आणि त्यांचे पती सर्जेराव यांचा फौंड्री व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी एका सहकारी बँकेतून २५ लाख रुपये कर्ज घेतले आहे. ते थकीत गेल्यामुळे दुसरीकडून कर्ज घेऊन ते फेडण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. या दरम्यान त्यांची संदीप सरनाईक याच्या माध्यमातून अर्चना पाटील व अमोल काटे यांची भेट झाली. त्यांनी रंजना यांना एक कोटी रुपये कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्या कर्जाच्या मंजुरीसाठी म्हणून वेळोवेळी १९ लाख ५५ हजार ६२० रुपये घेतले. मात्र, कर्ज मंजूर केले नाही. तसेच अमोल मोदी या खासगी सावकाराची भेट घालून देऊन मासिक २० टक्के व्याजाने कर्ज मिळवून देतो, म्हणून १०० रुपयांचा स्टॅम्प आणि दोन कोरे धनादेश घेतले. मोदीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करूनही वरील तिघांनी पुन्हा गुंडांकडून धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीbankबँक