गडहिंग्लजच्या महालक्ष्मी यात्रेतून १९ लाख शिल्लक

By Admin | Updated: August 20, 2015 00:37 IST2015-08-20T00:37:06+5:302015-08-20T00:37:06+5:30

रमेश रिंगणे यांची माहिती : जमा-खर्च केला सादर

19 lakh bales of Mahalaxmi yatra of Gadhinglaj | गडहिंग्लजच्या महालक्ष्मी यात्रेतून १९ लाख शिल्लक

गडहिंग्लजच्या महालक्ष्मी यात्रेतून १९ लाख शिल्लक

गडहिंग्लज : गडहिंग्लजच्या श्री महालक्ष्मी यात्रेसाठी भाविकांकडून एकूण ८४ लाख ६२ हजार ९१८ रुपये देणगी जमा झाली. त्यापैकी एकूण खर्च ६५ लाख ६६ हजार २६८ वजा जाता एकूण १८ लाख ९६ हजार ६५० रुपये शिल्लक राहिले आहेत, अशी माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी दिली.५ ते ७ मे २०१५ या कालावधीत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा पार पडली. तब्बल १४ वर्षांनंतर झालेली ही यात्रा ग्रामस्थ, नगरपालिका, शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी आणि विविध माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या सहकार्यामुळेच यशस्वीरीत्या पार पडली, असेही रिंगणे यांनी स्पष्ट केले. यात्रेनिमित्त जमा झालेल्या देणगीचा जमा-खर्च त्यांनी तपशीलासह सादर केला.
रिंगणे म्हणाले, लोकभावनेचा आदर करून स्त्री शक्तीचा जागर आणि संस्कृती संवर्धनाच्या उदात्त हेतूनेच ही यात्रा साजरी केली. त्यामुळेच ती निर्विघ्नपणे पार पडली. यात्रेनिमित्त शहरात बसविलेले ३१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा यात्रेनंतर पोलीस खात्याकडे सुपूर्द केली. यावेळी खातेदार यशवंत पाटील, यात्रा कमिटी उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, खजिनदार काशिनाथ देवगोंडा, सचिव अर्जुन भोईटे, कार्याध्यक्ष दत्तात्रय बरगे, सहकार्याध्यक्ष शिवाजीराव खणगावे, अरुण बेल्लद व बाळासाहेब मोरे, सहसचिव चंद्रकांत सावंत यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर आणि सर्व सदस्य, पंचमंडळी, मानकरी, हक्कदार व सेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 19 lakh bales of Mahalaxmi yatra of Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.