चांदोली धरण क्षेत्रात तब्बल १८५ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:01+5:302021-06-18T04:18:01+5:30
शित्तूर-वारूण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या २४ तासांत तब्बल १८५ मिलीमीटर ...

चांदोली धरण क्षेत्रात तब्बल १८५ मिलिमीटर पाऊस
शित्तूर-वारूण : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या २४ तासांत तब्बल १८५ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. मुसळधार पावसामुळे येथील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. डोंगर माथ्यावरील ओहळांचे व धबधब्यांचे पाणी वारणा नदीपात्रात येत असल्याने नदीच्या पाणीपातळीतही कमालीची वाढ झाली आहे.
मुसळधार पावसाने धरणाच्या पाणीपातळीतही वाढ होत असून धरणाची पाणीपातळी ६०३.४० मीटर झाली आहे. धरणात सध्या १५.१२ टी.एम.सी. पाणीसाठा झाला असून धरण सध्या ४३.९५ टक्के भरले आहे. पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे.
फोटो :
चांदोली धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. (छाया : सतीश नांगरे)