जयवंत विद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:27 IST2021-08-28T04:27:57+5:302021-08-28T04:27:57+5:30

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार अशोकराव माने पॉलिटेक्निक येथे करण्यात आला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्या ...

18 students of Jaywant Vidyalaya succeed in scholarship examination | जयवंत विद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

जयवंत विद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार अशोकराव माने पॉलिटेक्निक येथे करण्यात आला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने प्रमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. विविध बुद्धिमत्ता परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी शालांत परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी चांगली करून घेतली जाते. मार्गदर्शन , सराव, वैयक्तिक लक्ष यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे देदीप्यमान यश मिळत आहे, असे मुख्याध्यापक जितेंद्र म्हैशाळे यांनी सांगितले.

फोटो ओळी-मजले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनीषा माने, जितेंद्र म्हैशाळे, शिक्षक उपस्थित होते.

Web Title: 18 students of Jaywant Vidyalaya succeed in scholarship examination