निपाणीच्या विकासासाठी १७.५२ कोटी : ज्वोल्ले
By Admin | Updated: December 15, 2014 00:23 IST2014-12-15T00:23:06+5:302014-12-15T00:23:19+5:30
मंजूर झालेली विकासकामे वर्षभरात पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील

निपाणीच्या विकासासाठी १७.५२ कोटी : ज्वोल्ले
निपाणी : निपाणी शहराच्या विकासासाठी १७ कोटी ५२ लाख ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून रस्ते, गटारी अशी कामे होणार आहेत. अनेक कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येणारे नवीन वर्ष विकासाचे पर्व ठरणार आहे, अशी माहिती आमदार शशिकला ज्वोल्ले यांनी दिली. निपाणीतील आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ज्वोल्ले म्हणाल्या, मंजूर झालेली विकासकामे वर्षभरात पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. बऱ्याच वर्षांपासून रखडलेले २४ लाख रुपये खर्चाचे पाणी योजनेचे काम या नवीन वर्षात पूर्ण होणार आहे. निपाणी शहरातील रस्ते आणि गटारींसाठी १७ कोटी ५२ लाख ३६ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. राणी लक्ष्मीबाई सूतिकागृह, प्रतिभानगर उद्यानाचेही नूतनीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आण्णासाहेब ज्वोल्ले यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)