शाहूवाडीत १७२ सक्रिय रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:45+5:302021-05-19T04:23:45+5:30

बांबवडे येथे एका खासगी दवाखान्यात कोविड रुग्णावर ॲडमिट करून उपचार केले जात आहेत . सरकारी दवाखान्यात होणारी कोविडची टेस्ट ...

172 active patients in Shahuwadi | शाहूवाडीत १७२ सक्रिय रूग्ण

शाहूवाडीत १७२ सक्रिय रूग्ण

बांबवडे येथे एका खासगी दवाखान्यात कोविड रुग्णावर ॲडमिट करून उपचार केले जात आहेत . सरकारी दवाखान्यात होणारी कोविडची टेस्ट बंद असून तीन हजार , दोन हजार रुपये अशी रक्कम घेतली जात आहे . तर खासगी दवाखान्यात कोविड रुग्णाच्या उपचारासाठी वीस ते पंचवीस हजार रुपये घेतले जात आहेत .

तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने आपली यंत्रणा सतर्क केली आहे . पोलिसांनी संपूर्ण तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवला आहे . आरोग्य विभागाने तीन ठिकाणी कोविड रुग्णांच्या उपचाराची सोय केली आहे. मात्र कोविड सेंटरमध्ये फक्त रुग्णावर उपचार केले जात आहेत . औषधे , गोळ्या बाहेरून रुग्णांच्या नातेवाईकांना आणायला सांगितले जाते . सरकारी दवाखान्यात होणारी रक्त , लघवी , शुगर , ही टेस्ट बंद आहे . त्यामुळे खासगी लॅबवल्यांची चलती सुरु आहे . एका टेस्टसाठी तीन ते दोन हजार रुपये घेतले जात आहेत . कोरोनाची एवढी भीती नागरिकांनी घेतली आहे की आरोग्य विभागाने मागितलेले पैसे गुपचूप दिले जात आहेत . तालुक्यात ३ हजार २४५ नागरिकांची कोरोना टेस्ट केली आहे. १ हजार ६४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत . १ हजार ७० रुग्णांच्या रॅपिट अँटिजन टेस्ट केल्या आहेत . भेडसगाव, हणमंतवाडी , सरुड , मलकापूर , ओकोली आदी गावे कोरोनाची हॉटस्पॉट बनू लागली आहेत.

Web Title: 172 active patients in Shahuwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.