शहरातील १७ शाळा शंभर नंबरी
By Admin | Updated: June 7, 2016 07:39 IST2016-06-07T07:39:23+5:302016-06-07T07:39:23+5:30
जिल्ह्यात अव्वलतेची हॅट्ट्रिक : ४१ हजार विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’

शहरातील १७ शाळा शंभर नंबरी
कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेत विभागामध्ये सलग तिसऱ्यांदा अव्वल राहण्याची हॅट्ट्रिक कोल्हापूर जिल्ह्याने साधली आहे. यावर्षी ९४.८४ टक्क्यांसह जिल्ह्याने विभागात पहिला क्रमांक पटकविला आहे. जिल्ह्यतील ४१,१८४ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. शिवाय शहरातील १७ शाळांचा निकाल शंभर टक्के, तर २९ शाळांचा निकाल ९० टक्क्यांहून लागला आहे.
शहरातील के. बी. पाटील नाईट स्कूल, होलीक्रॉस कॉन्व्हेट हायस्कूल, श्रीपतराव बोंद्रे इंग्लिश मीडियम स्कूल, जीवन कल्याण माध्यमिक विद्यालय, श्रीमंत माईसाहेब बावडेकर विद्यालय, छत्रपती शाहू विद्यालय, व. ज. देशमुख हायस्कूल, डॉ. डी. वाय. पाटील विद्यानिकेतन, सुसंस्कार हायस्कूल, राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, भारती विद्यापीठ हायस्कूल (कदमवाडी), एम. ए. आझाद ऊर्दू हायस्कूल, महावीर इंग्लिश स्कूल, हनुमंतराव चाटे स्कूल, प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल, वसंतराव चौगुले, एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे. (प्रतिनिधी)