‘गोकुुळ’साठी १७ हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:26 IST2021-02-24T04:26:17+5:302021-02-24T04:26:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या प्रारूप यादीवर मंगळवारी १७ हरकती आल्या आहेत. यामध्ये नावात दुरुस्ती, ठराव ...

‘गोकुुळ’साठी १७ हरकती
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या प्रारूप यादीवर मंगळवारी १७ हरकती आल्या आहेत. यामध्ये नावात दुरुस्ती, ठराव बदलणे व मृत व्यक्तीसंबंधी ठराव, आदी हरकतींचे स्वरूप आहे. आज, बुधवारी हरकतीचा शेवटचा दिवस आहे.
‘गोकुळ’ची प्रारूप यादी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यावर १५ फेब्रुवारीपासून हरकती मागविल्या होत्या. मंगळवारी नावात दुरुस्तीसाठी ४, ठरावाचे नाव बदलणे ३, मृत व्यक्तीसंबंधी ठराव बदलणे ३ व इतर हरकती ७ अशा १७ हरकती दाखल झाल्या आहेत. हरकती घेण्याच्या आज, बुधवार हा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेसाठी ठराव दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत ८५०० ठराव सहकार विभागाकडे आले आहेत. मंगळवारी दिवसभर निबंधक कार्यालयाच्या पातळीवर दाखल ठरावांची छाननी सुरू होती. छाननी करून यादी जिल्हा बँकेकडे पाठविली जाणार आहे.