१३ जागांसाठी१७ उमेदवार रिंंगणात भोगावती शिक्षण मंडळ निवडणूकं

By Admin | Updated: May 18, 2014 00:45 IST2014-05-18T00:44:53+5:302014-05-18T00:45:17+5:30

भोगावती : येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या १३ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी १७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

17 candidates for 13 seats, Bhuvavati Shikshan Mandal elections in Rimganj | १३ जागांसाठी१७ उमेदवार रिंंगणात भोगावती शिक्षण मंडळ निवडणूकं

१३ जागांसाठी१७ उमेदवार रिंंगणात भोगावती शिक्षण मंडळ निवडणूकं

 भोगावती : येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या १३ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी १७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रयत्नांना अखेर यश आले नाही. शिक्षण मंडळाच्या निवडणुकीसाठी एकूण ९८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. काँग्रेस वगळता सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाने प्रयत्न केले. त्याला काहीअंशी यश आले देखील; मात्र काही चार अपक्ष उमेदवारांनी कोणालाही दाद न देता माघार घेतली नाही. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीला ‘खो’ बसून निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापक्ष, शिवसेना, जनता दल यांचे संयुक्त पॅनेल तयार झाले आहे. याच्या विरोधी अपक्ष चार उमेदवार लढत देणार आहेत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) यांनी राष्ट्रवादीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 17 candidates for 13 seats, Bhuvavati Shikshan Mandal elections in Rimganj