वीरशैव बँकेसाठी १७ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST2021-01-08T05:14:45+5:302021-01-08T05:14:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : सहकारातील अग्रगण्य वीरशैव को. ऑप. बँकेसाठी पहिल्याच दिवशी विविध गटांतून १७ अर्ज दाखल झाले. ...

वीरशैव बँकेसाठी १७ अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : सहकारातील अग्रगण्य वीरशैव को. ऑप. बँकेसाठी पहिल्याच दिवशी विविध गटांतून १७ अर्ज दाखल झाले. बँक बहुराज्यीय असून मंगळवार (दि. १२)पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. गेल्या पाच वर्षांत संचालक मंडळाने केलेले कामकाज पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
कोविडमुळे बँकिंग क्षेत्रावर ही विपरीत परिणाम झाला आहे. नागरी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमावलीप्रमाणे भागधारकांची व गुंतवणूकदारांच्या पैशांची सुरक्षा व एनपीए कमी करण्याबाबत दक्ष राहावे लागणार आहे. आधुनिक सेवा, व्यवहारातील पारदर्शकता आणि खासगी व्यावसायिक बँकांशी स्पर्धा यामुळे नागरी बँकांसाठी पुढील काळ आव्हानांचा असणार आहे. त्यामुळे आगामी काळात सहकारी बँकांना त्यादृष्टीने नियोजन करून पुढे जावे लागणार आहे. वीरशैव बँकेने गेल्या पाच वर्षांत उत्कृष्ट व्यवस्थापन करत सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे. बँकेचे महाराष्ट्र व कर्नाटकात २३ हजार सभासद आहेत. १५ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतरच बँकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जागेपेक्षा अधिक अर्ज राहिले तर ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.