शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात लागणार १६ हजार कर्मचारी, तयारीला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:06 IST

जिल्ह्यात ३ हजार ३५९ मतदान केंद्र

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १६ हजार कर्मचारी लागणार आहेत. सध्या जिल्हा निवडणूक विभागाकडून कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यांना मतदार केंद्रनिहाय ड्युटी देण्यात येणार आहे. यासह निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्यांसाठी सध्या टेंडर प्रक्रिया राबवली जात आहे.लोकसभानिवडणूक या महिनाअखेरपर्यंत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक विभागाकडून देखील वेगाने कामकाज सुरू आहे. पाच वर्षातून एकदा होणाऱ्या या लोकशाहीच्या उत्सवासाठी गेली दोन महिने तयारी सुरू आहेच पण आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने व निवडणूक जाहीर व्हायला काहीच दिवस राहिल्याने निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे.निवडणुकीसाठी महसूलसह सर्वच विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या निकषानुसार यादी तयार करण्यात आली आहे. आचारसंहिता जाहीर होताच त्यांना कामकाजाचे वाटप केले जाईल. मतदार संख्या व मतदान केंद्रांची संख्या बघता राखीव कर्मचाऱ्यांसह १६ हजार कर्मचारी लागतील, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यात ३ हजार ३५९ मतदान केंद्रजिल्ह्यातील अंतिम मतदार यादीनुसार ३१ लाखांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून ही आकडेवारी पाहता सध्या ३ हजार ३५९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. एका केंद्रावर १५०० पेक्षा जास्त मतदार होत असतील तर नव्या मतदार केंद्राची शिफारस केली जाते.

पुरवणी यादी प्रसिद्ध होणार

निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध केली असली तरी निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपर्यंत मतदार याद्या अद्ययावत केल्या जातात. वाढलेल्या मतदारांची नावे पुरवणी यादीत समाविष्ट होतात.

मतदारसंघ : मतदान केंद्र संख्या

  • हातकणंगले : १२०८
  • राधानगरी : ४२५
  • चंदगड : ३८०
  • करवीर : ३५६
  • कागल : ३५३
  • शाहुवाडी : ३३३
  • कोल्हापूर दक्षिण : ३२६
  • कोल्हापूर उत्तर : ३११
  • एकूण केंद्रे : ३ हजार ३५९
टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा