शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

कोल्हापूर विभागातील १६ साखर कारखान्यांचे क्षमतेपेक्षा कमी गाळप, पंधरा हजार मजूर आलेच नाहीत 

By राजाराम लोंढे | Updated: December 14, 2023 13:02 IST

कारखान्याचे आर्थिक गणित बिघडणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखाने क्षमतेपेक्षा कमीने गाळप करत आहेत. परजिल्ह्यातील यंदा सुमारे १५ हजार मजूर कमी आल्याने अपेक्षित ऊस पुरवठा होत नसल्याने, रोज ६० हजार टनापेक्षा अधिकचा ऊस कमी पडत आहे. स्थानिक ऊसतोड मजूर असलेले पश्चिमेकडील काही कारखान्यांचे गाळप जोरात सुरू आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस पिकांची वाढ अपेक्षित झालेली नाही. फेब्रुवारीपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पिके जगविणे मुश्कील होणार आहे. अशा परिस्थितीत हंगाम वेळेत सुरू होईल, असे वाटत होते. मात्र, ऊस दराच्या आंदोलनामुळे महिनाभर हंगाम पुढे गेला. महिनाभर झाले हंगाम सुरू होऊन, आता हंगामाने गती घेणे अपेक्षित होते.मात्र, कोल्हापुरातील ९ व सांगलीतील ७ कारखान्यांचे क्षमतेपेक्षा कमी गाळप होत आहे. या कारखान्यांना रोज सरासरी ६० हजार टनांपेक्षा अधिक तुटवडा भासत आहे. आता ही परिस्थिती आहे, तर हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात काय करायचे, असा प्रश्न कारखान्यांसमोर आहे.

उताऱ्यात यंदा ‘राजारामबापू’च आघाडीवरसाखर उताऱ्यात पहिल्या महिन्यात सांगली जिल्ह्यातील राजारामबापू सहकारी साखर कारखाना व त्यांचेच करंदवाडी युनिट आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी कारखान्याचा उतारा राहिला आहे.या कारखान्यांनी केली इथेनॉलची निर्मितीकोल्हापूर : ‘वारणा’, ‘दत्त-शिरोळ’, ‘उदयसिंगराव गायकवाड’, ‘डी.वाय. पाटील’, ‘गुरुदत्त’, ओलम ॲग्रो, दौलतसांगली : दत्त इंडिया-सांगली, सोनहिरा-कडेगाव, उदगीर शुगर, सद्गुरू श्री.श्री-राजेवाडीविभागात दीड लाखांहून अधिक मजूरकोल्हापूर व सांगली जिल्ह्यात स्थानिकचे ५० हजार, तर परजिल्ह्यातील एक लाख असे दीड लाखाहून अधिक मजूर ऊस तोडणीचे काम करतात. मात्र, यंदा १५ ते १६ हजार परजिल्ह्यातील मजूर आलेलेच नाहीत. त्यामुळे ऊसपुरवठ्याचा गुंता तयार झाला आहे.

क्षमतेपक्षा कमी गाळप करणारे कारखाने कारखाना  -  क्षमता  -  सध्याचे गाळपवारणा  - १२ हजार - १० हजारदत्त-शिरोळ  - १२ हजार - १० हजार ८१०शाहू-कागल  -  ७ हजार ५०० - ७ हजार ३५०जवाहर-हुपरी  - १६ हजार - १४ हजार १००राजाराम-कसबा बावडा - ३ हजार ५०० - ३ हजार २५०गायकवाड  -  ६ हजार   - ४ हजार ७६०गुरुदत्त-टाकळीवाडी-  ६ हजार - ५ हजार ४२०संताजी घोरपडे - ८ हजार  -  ६ हजार २७५इंदिरा-तांबाळे   -  ४ हजार -   ३ हजार ६०२

ऊसतोड मजुरांची नवी पिढी या व्यवसायात येत नाही. इतर राज्यांच्या तुलनेत येथे मजुरी कमी असल्याने मजूर येत नाहीत. यंदा सरासरी १२ टक्के मजूर आलेले नाहीत. - डॉ.सुभाष जाधव (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी-वहातूक संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने