राष्ट्रीय लोकअदालतीत महावितरणची १५ हजार प्रकरणे

By Admin | Updated: November 10, 2016 00:13 IST2016-11-10T00:06:09+5:302016-11-10T00:13:33+5:30

कोल्हापूर परिमंडलाकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेली १५ हजार ८०१ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार

15,000 cases of MSEDCL in the National People's Recession | राष्ट्रीय लोकअदालतीत महावितरणची १५ हजार प्रकरणे

राष्ट्रीय लोकअदालतीत महावितरणची १५ हजार प्रकरणे

कोल्हापूर : महावितरण जिल्हा विधिसेवा प्राधिकरण, कोल्हापूर व सांगली तसेच महावितरण यांच्यातर्फे शनिवारी (दि. १२) होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महावितरण, कोल्हापूर परिमंडलाकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेली १५ हजार ८०१ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. या ग्राहकांकडे महावितरणची ४ कोटी ४० लाख रुपये थकबाकी आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने १ नोव्हेंबरपासून व्याज व दंडमाफीची योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवलेल्या दाखलपूर्व प्रकरणांना मिळणार आहे. तसेच एकरकमी मूळ थकबाकी भरल्यास पाच टक्क्यांची थेट सवलत दिली जाणार आहे. शिवाय अशा प्रकरणांत व्याज व दंडाच्या रकमेत १०० टक्के माफी दिली जाते. कोल्हापूर जिल्'ातून ६९३४, तर सांगली जिल्'ातून ८८६७ प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली आहेत. त्यांच्याकडे अनुक्रमे २ कोटी ४३ लाख व १ कोटी ९६ लाख असे मिळून ४ कोटी ४० लाख रुपये रक्कम थकीत आहे. यातील सर्व ग्राहकांना नोटिसांद्वारे कळविण्यात आले आहे. लोकअदलातीसाठी संबंधित ग्राहकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन कनिष्ठ विधी अधिकारी धनंजय टंकसाली, नीलम नलावडे, घणाली पोतदार यांनी केले आहे.

Web Title: 15,000 cases of MSEDCL in the National People's Recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.