कोल्हापूरचा परभणीवर १५0 धावांनी विजय
By Admin | Updated: September 1, 2015 23:26 IST2015-09-01T23:24:42+5:302015-09-01T23:26:26+5:30
१६ वर्षांखालील निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूरचा परभणीवर १५0 धावांनी विजय
कोल्हापूर : शाहूपुरी जिमखाना येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या वतीने निमंत्रित १६ वर्षांखालील (दोन दिवसीय) क्रिकेट स्पर्धांत कोल्हापूर जिल्हा संघाने परभणी जिल्हा संघावर १५० धावांनी विजय मिळविला.
कोल्हापूर जिल्हा संघाने पहिल्या डावात ४४.५ षटकांत सर्व बाद ९६ धावा केल्या. यामध्ये क्षितीज पाटीलने १८, रणजित निकमने १२ धावा केल्या. परभणी जिल्हा संघाकडून गोलंदाजी करताना यशकुमार चांदेकरने ५, वेदांत महाजनने ३ व केदार पागोटेने २ गडी बाद केले.परभणी जिल्हा संघाकडून फलंदाजी करताना ४०.५ षटकांत सर्वबाद ६५ धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये कृष्णात कुलकर्णीने २१, यशकुमार चांदेकरने १७ व आकाश कुंथेने १२ धावा केल्या. कोल्हापूर जिल्हा संघाकडून ओंकार मोहितेने ४, श्रीराज चव्हाणने ३, राजवर्धन मंडलिक व रोहन तोरस्कर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. कोल्हापूर संघाने पहिल्या डावात ३१ धावांची आघाडी घेतली. कोल्हापूर संघाने दुसरा डाव ४४ षटकांत ७ बाद १८३ धावांवर घोषित केला. यामध्ये वैभव पाटीलने नाबाद ६४, रणजित निकमने ६४, श्रीराज चव्हाणने १५, क्षितीज पाटीलने १२ धावा केल्या. गोलंदाजी करताना परभणी जिल्हा संघाकडून यशकुमार चांदेकर, वेदांत महाजन यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. आकाश कुंथे व केदार पागोटे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
परभणी जिल्हा संघाचा दुसरा डाव २३.४ षटकांत सर्वबाद ६९ धावांवर गुंडाळला. यामध्ये मंगेश सातपुतेने १५ व यशकुमार चांदेकरने १४ धावा केल्या. कोल्हापूर संघाकडून श्रीराज चव्हाणने ५, राजवर्धन मंडलिक व क्षितीज पाटील यांनी प्रत्येकी २, ओंकार मोहितेने १ गडी बाद केला. (प्रतिनिधी)