कोगनोळी परिसरातून आज पर्यंत 150 मोटरसायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:18 IST2021-06-03T04:18:30+5:302021-06-03T04:18:30+5:30
कोगनोळी : महाराष्ट्र कर्नाटक आंतर राज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी फाटा व कोगनोळी परिसरातून संचारबंदी काळात अनावश्यक फिरणाऱ्या मोटरसायकलस्वारांवर जप्तीची ...

कोगनोळी परिसरातून आज पर्यंत 150 मोटरसायकली जप्त
कोगनोळी : महाराष्ट्र कर्नाटक आंतर राज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी फाटा व कोगनोळी परिसरातून संचारबंदी काळात अनावश्यक फिरणाऱ्या मोटरसायकलस्वारांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात या परिसरातून दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे या परिसरातून आजपर्यंत 150 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमध्ये लोकांच्या अनावश्यक प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शासनाने दिलेल्या सवलती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी बाहेर प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर ही कारवाई करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेली वाहने संचारबंदी कालावधी संपल्यानंतरच वाहनांची कागदपत्रे तपासून मालकाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक एस. ए. तोलगी कॉन्स्टेबल पी. एम. गस्ती, अमर चंदनशिव, राजू गोरखनावर यांच्यासह इतर पोलीस व होमगार्डसच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
जनतेने कोरोना काळातील प्रतिबंधक आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना प्रतिबंधित आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर वाहनजप्तीची कारवाई करण्यात येत आहे.
....... .. .... ...
- बी. एस. तळवार उपनिरीक्षक, निपाणी ग्रामीण पोलीस स्थानक
ग्रामपंचायत उपाध्यक्षांच्या वाहनावरही कारवाई
शेतीसाठी लागणारी औषध आणण्यासाठी गेलेल्या कोगनोळी ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांच्यावरही पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. नंतर त्यांनी आणलेली खते व औषधे दाखवल्याने त्यांना सोडण्यात आले.
फोटो ओळ : कोगनोळी परिसरात अनावश्यक फिरणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.
(छाया : बाबासो हळीज्वाळे)