राधानगरी तालु्क्यातील १५० सहकारी संस्था निवडणुकीस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:21 IST2021-01-02T04:21:47+5:302021-01-02T04:21:47+5:30

दुर्गमानवाड : राधानगरी तालुक्यातील 418 पैकी 150 सहकारी संस्था डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र असून सर्वांधिक 105 विकास ...

150 co-operative societies in Radhanagari taluka are eligible for election | राधानगरी तालु्क्यातील १५० सहकारी संस्था निवडणुकीस पात्र

राधानगरी तालु्क्यातील १५० सहकारी संस्था निवडणुकीस पात्र

दुर्गमानवाड : राधानगरी तालुक्यातील 418 पैकी 150 सहकारी संस्था डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र असून सर्वांधिक 105 विकास सेवा संस्थांचा समावेश आहे. सहकार खात्याकडून आदेश आल्यानंतर त्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार, अशी माहिती राधानगरीचे सहायक निबंधक ए.व्ही.?????????????????????????

राधानगरी तालुक्यात 199 विकास सेवा संस्था आहेत त्यापैकी 105 विकास सेवा संस्था, 53 ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेपैकी 23 पतसंस्था, 18 वाहतूक सहकारी संस्थेपैकी 10 संस्था, सात ग्राहक संस्थेपैकी चार, सात सेवकांची पतसंस्थेपैकी चार, तर अकरा मजूर सहकारी संस्थेपैकी चार संस्थांचा डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांत समावेश आहे, असे गराडे यांनी सांगितले.

सध्या तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: 150 co-operative societies in Radhanagari taluka are eligible for election