शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

सीमाप्रश्न, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात १५ दिवस बंदी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 13:21 IST

कोणतेही शस्त्र जवळ बाळगणे आणि पाच अगर पाचहून अधिक लोकांनी एकत्र येणे यावर बंदी

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तापलेले वातावरण, महाविकास आघाडीने उद्या दिलेला आंदोलनाचा इशारा आणि जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या सर्व बाबींचा विचार करून कोल्हापूर पोलिसांनी आज शुक्रवारपासून १५ दिवसांसाठी बंदी आदेश जारी केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा याबाबत आदेश काढण्यात आले आहेत.कर्नाटकामध्ये कन्नड वेदिके संघटनेने वाहनांवर केलेला हल्ला, त्याच्या कोल्हापूरमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया, त्यामुळे स्थानिक कन्नड व्यावसायिक आणि रहिवासी यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता तसेच महाविकास आघाडीने शनिवारी जाहीर केलेले आंदोलन आणि त्यासाठी बेळगावहून एकीकरण समितीच्या नेत्यांना दिलेले निमंत्रण या सर्व बाबींचा विचार करून हा बंदी आदेश जारी करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.आज शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून २३ डिसेंबर २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतचा हा बंदी आदेश अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जारी केला आहे. त्यानुसार कोणतेही शस्त्र जवळ बाळगणे आणि पाच अगर पाचहून अधिक लोकांनी एकत्र येणे यावर बंदी आली आहे. साहजिकच आता महाविकास आघाडीलाही त्यांचे आंदोलन रद्द करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकgram panchayatग्राम पंचायत