पट्टणकोडोली कोविड सेंटरमधून १४ रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:45+5:302021-06-18T04:17:45+5:30

पट्टणकोडोली येथील ग्रामपंचायत आयसोलेशन सेंटरमधून ६२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन सुरक्षित घरी परतले आहेत. आज १४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन ...

14 patients cured from Pattankodoli Kovid Center | पट्टणकोडोली कोविड सेंटरमधून १४ रुग्ण बरे

पट्टणकोडोली कोविड सेंटरमधून १४ रुग्ण बरे

पट्टणकोडोली येथील ग्रामपंचायत आयसोलेशन सेंटरमधून ६२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन सुरक्षित घरी परतले आहेत. आज १४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन सेंटरमधून घरी परतले. याप्रसंगी डॉ. सुदर्शन कोळी, डॉ. राहुल हावळ, डॉ. पद्मराज मगदूम, डॉ. विनायक मलगुंडे, डॉ. अनुप पाटील आणि डॉ. सुमन कांबळे यांनी केलेल्या उपचाराप्रती आभार मानत या रुग्णांनी त्यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. तर रुग्णांनी डॉक्टर आणि स्वयंसेवक पंचायत समिती सदस्य अरुण माळी, उपसरपंच अंबर बनगे, सदस्य सुरेश भोजे, बिरू कुशाप्पा, इरफान मुजावर, जालेंद्र पाटील, शरद पुजारी, दीपक सुतार आणि ग्रामपंचायतीचे इतर सदस्य यांचे आपल्या मनोगतामधून आभार मानले. या वेळी अनेक रुग्णांना आपल्या भावना आवरता न आल्याने त्यांचे अश्रू अनावर झाले.

-

फोटो ओळ : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत आयसोलेशन कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या १४ रुग्णांनी डॉक्टरांचा सत्कार केला. घरी जात असताना रुग्णांना झाडे भेट म्हणून देण्यात आली.

Web Title: 14 patients cured from Pattankodoli Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.