उत्तूर-गारगोटी महामार्गावर १४ लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:51+5:302021-02-16T04:26:51+5:30

कोल्हापूर : ट्रकमध्ये विशेष कप्पा करून त्यातून चोरुन गोवा बनावटीच्या मद्याची चोरटी वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ...

14 lakh liquor seized on North-Gargoti highway | उत्तूर-गारगोटी महामार्गावर १४ लाखांचा मद्यसाठा जप्त

उत्तूर-गारगोटी महामार्गावर १४ लाखांचा मद्यसाठा जप्त

कोल्हापूर : ट्रकमध्ये विशेष कप्पा करून त्यातून चोरुन गोवा बनावटीच्या मद्याची चोरटी वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उघडकीस आणली. उत्तूर-गारगोटी रोडवर केलेल्या कारवाईत विभागाने १४ लाखांचा मद्यसाठा जप्त केला. कारवाईत मद्यसाठयासह सात लाख १२ हजार रुपयांची भाताच्या टरफलाची पोती, मोबाईल, ट्रक असा सुमारे २१ लाख ४२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ट्रकचालकासह दोघांवर गुन्हा दाखल केला. हा मद्यसाठा सोलापूर जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.

गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आजरा-उत्तूर-गारगोटी मार्गावर रविवारी (दि. १४) रात्री सापळा रचला. एक ट्रक अडवताना तो न थांबता सुसाट वेगाने निघून गेला. पुढे उत्तूर-गारगोटी मार्गावरील दुसऱ्या भरारी पथकाला माहिती दिल्याने सोमवारी सकाळी मांगनूर गावामध्ये हा ट्रक पकडला. चालकाकडे विचारपूस करता ट्रकमध्ये भाताच्या टरफलांची पोती असल्याचे सांगितले. पाहणीत ट्रकमध्ये पोत्यांखाली मद्याचा साठा आढळला. १४ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मद्यसाठा तसेच भाताच्या टरफलाची पोती, मोबाईल, ट्रक असा सर्व मिळून २१ लाख ४२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक संजय नागनाथ शेंडगे (वय ४७, रा. कुर्डुवाडी, वाघ वस्ती, ता. माढा, जि .सोलापूर), सहकारी अक्षय दिलीप जाधव (२६, रा. कुर्डुवाडी, चौधरी वस्ती, ता. माढा, जि.सोलापूर) यांना अटक केली. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. मद्यसाठा सोलापूर येथील संतोष अशोक शिंदे याच्याकडे विक्रीसाठी नेला जात असल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल केला.

ही कारवाई विभागाचे जिल्हा अधीक्षक संध्याराणी देशमुख, उपअधीक्षक बापूसो चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी बरगे, जगन्नाथ पाटील, सचिन काळेल, किशोर नडे, संदीप जानकर, मारुती पोवार, सागर शिंदे यांनी केली.

ट्रकमध्ये विशेष कप्पे

पकडलेल्या ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये भाताच्या टरफलांची पोती होती. ट्रकची लांबी आणि आतील हौद्याची लांबी यामध्ये विसंगती दिसल्याने भरारी पथकाने हौदाची कसून तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये विशेष कप्पे करून त्यामध्ये मद्याची खोकी लपवल्याचे निदर्शनास आले.

फोटो नं. १५०२२०२१-कोल-एक्साईज०१

ओळ :

Web Title: 14 lakh liquor seized on North-Gargoti highway