जिल्हा बँकेसाठी १३३ ठराव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:44 IST2021-02-18T04:44:53+5:302021-02-18T04:44:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी बुधवारी चार गटांतून १३३ ठराव दाखल झाले. सर्वाधिक ५२ ठराव ...

133 Resolutions filed for District Bank | जिल्हा बँकेसाठी १३३ ठराव दाखल

जिल्हा बँकेसाठी १३३ ठराव दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी बुधवारी चार गटांतून १३३ ठराव दाखल झाले. सर्वाधिक ५२ ठराव हातकणंगले तालुक्यातून दाखल झाले. सोमवार (दि. २२)पर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत आहे.

जिल्हा बँकेसाठी सहकार विभागाने संस्था प्रतिनिधींच्या नावाने ठराव मागविले आहेत. सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, बुधवारी एकाच दिवशी १३३ ठराव दाखल झाले. राधानगरी, चंदगड व शाहूवाडी तालुक्यातून एकही अर्ज दाखल झाला नाही. गट क्रमांक ४ (इतर संस्था) मध्ये १०१ ठराव दाखल झाले.

‘गोकुळ’साठी तीन मयत हरकती

‘गोकुळ’च्या प्रारूप यादीवर हरकती सुरू आहेत. मयत झालेल्या प्रतिनिधींचे नाव बदलण्याबाबत हरकती येत आहेत. बुधवारी या प्रकारच्या तीन हरकती दुग्ध विभागाकडे आल्या आहेत.

बुधवारी जिल्हा बँकेसाठी आलेले ठराव -

गट ठराव

१ ११

२ १

३ २०

४ १०१

एकूण १३३

Web Title: 133 Resolutions filed for District Bank