शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नमो पेन्शनला कोल्हापूर जिल्ह्यातील १.३२ लाख शेतकरी मुकण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

By राजाराम लोंढे | Updated: June 15, 2023 13:33 IST

१.३२ लाख अपात्रतेची कारणे शोधण्याचे आदेश

राजाराम लोंढे कोल्हापूर : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री शेतकरी पेन्शन योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो पेन्शन योजना सुरू होत आहे. राज्य सरकारने केंद्राच्या यंत्रणेकडूनच पात्र लाभार्थींची यादी मागितली आहे. मात्र, केंद्राच्या तेराव्या हप्त्यात जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना पेन्शन मिळालीच नाही. त्यामुळे नमो योजनेलाही या शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांत पेन्शन देण्याचा निर्णय साडे चार वर्षांपूर्वी घेतला. जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी ५ लाख २८ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला होता. त्यानंतर आतापर्यंत १३ हप्ते पेन्शनचे आले आहेत. केंद्र सरकारच्या योजनेसाठी निकष होते, मात्र तपासणीमध्ये सरकारी व निमसरकारी कर्मचारी, इतर पेन्शनधारक, आयकर परतावा करणारे, पती-पत्नी दोघांनाही लाभ आदी विविध गोष्टी समोर आल्या. संबंधितांची पेन्शन रद्द केली, त्याचबरोबर काही जणांकडून पूर्वी घेतलेल्या पेन्शनचे पैसे वसूलही केले.केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या योजनेचे निकष कायम ठेवत असतानाच, त्यांनी त्यांच्याकडूनच पात्र शेतकऱ्यांची यादी घेतली आहे. तेराव्या हप्त्यात जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांची पेन्शन आलेली नाही. हीच यादी राज्याने ग्राह्य धरून पेन्शन सुरू केली तर तेवढे शेतकरी राज्याच्या पेन्शनपासून वंचित राहणार असल्याने अस्वस्थता आहे.दोन दिवसांत पेन्शन जमा होणारकेंद्र सरकारचा चौदावा हप्ता दोन दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.

१.३२ लाख अपात्रतेची कारणे शोधण्याचे आदेशतेराव्या हप्त्यात जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते. पेन्शन न आल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, चौकशी केली तर अधिकाऱ्यांकडून उत्तर मिळत नाही. आधार लिंक नाही, केवायसी पूर्तता नाही, याशिवाय आणखी काय कारणे आहेत. याचा शोध घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कृषी विभागाकडून अजून टोलवाटोलवीचकृषी व महसूल विभागाच्या जबाबदारीवरून गेली सहा महिने नवीन प्रस्तावच स्वीकारले जात नाहीत. आता कृषी विभागाकडे जबाबदारी दिली तरी अजूनही टोलवाटोलवी सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीPensionनिवृत्ती वेतन