टिक्केवाडीतील १३ वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST2021-07-21T04:17:54+5:302021-07-21T04:17:54+5:30
याबाबत अधिक माहिती अशी, आनंदा मिटके हे आपल्या पत्नीसोबत सोमवारी कोल्हापूर येथील दवाखान्यात गेले होते. घरी त्यांची वयोवृद्ध आई ...

टिक्केवाडीतील १३ वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
याबाबत अधिक माहिती अशी, आनंदा मिटके हे आपल्या पत्नीसोबत सोमवारी कोल्हापूर येथील दवाखान्यात गेले होते. घरी त्यांची वयोवृद्ध आई आणि दोन मुले होती. आज मंगळवारी (दि २०) रोजी सकाळी मिटके यांच्या आईची तब्येत अचानक बिघडली म्हणून आनंदा मिटके यांचा मोठा मुलगा तिला कूर येथील दवाखान्यात घेऊन गेला. यादरम्यान घरी कुणी नसल्याचे पाहून सकाळी आठ ते साडेअकराच्या दरम्यान राज याने राहत्या घराच्या माडीवर जाऊन छताच्या वाश्याला दोरी लावून गळफास लावून घेतला. थोड्या वेळाने आजी त्याला शोधत असताना तो माडीवर दोरीला लटकत असल्याचे दिसताच तिने दारात येऊन आक्रोश केला. ग्रामस्थांनी राज याला उपचारसाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. या आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. याबाबतची वर्दी पोलीस पाटील नेताजी गुरव यांनी पोलिसात दिली.