राधानगरी तालुक्यातील १३ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:01+5:302021-07-14T04:28:01+5:30

म्हासुर्ली : कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता गृहित धरून राधानगरी विभागाचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी ...

13 villages in Radhanagari taluka declared as restricted area | राधानगरी तालुक्यातील १३ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

राधानगरी तालुक्यातील १३ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

म्हासुर्ली : कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता गृहित धरून राधानगरी विभागाचे उपविभागीय न्यायदंडाधिकारी प्रसेनजित प्रधान यांनी राधानगरी तालुक्यातील तेरा गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या गावांमधील वाढती रुग्णसंख्या पाहता, येथे १४ दिवस कडन लॉकडाऊन करण्यात येणार असून, दूध संकलन, शेतीची कामे व अत्यावश्यक सेवा वगळता सर्वप्रकारचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. सर्वसामान्य ग्रामस्थांसह कोरोना रुग्णांनी या आदेशाचे प्रभावीपणे पालन करावयाचे असून, यात हयगय झाल्यास थेट पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

तालुक्यातील म्हासुर्ली (६), राधानगरी (२०), सरवडे (९), राशिवडे (३७), टिटवे (२१), ठिकपुर्ली (२३), पालबु (३), कोते पैकी गोतेवाडी (३), धामोड (२७), तुरंबे (१६), क. वाळवे (४६), सोळांकूर (३), पुंगाव (६) या तेरा गावांमधील रुग्णवाढीची शक्यता गृहित धरून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या सर्वच गावांमध्ये ग्रामस्थांना गावाच्या आत-बाहेर करण्यास संपूर्णत: मज्जाव करण्यात आला असून, सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत.

Web Title: 13 villages in Radhanagari taluka declared as restricted area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.