६३ पन्ना कापडासाठी १३ पैसे मजुरीवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST2020-12-31T04:24:43+5:302020-12-31T04:24:43+5:30
असोसिएशनच्या बैठकीत निर्णय इचलकरंजी : एअरजेट लूमवर तयार होणाऱ्या ६३ पन्ना कापडासाठी किमान १३ पैसे मजुरीवाढ मिळणे आवश्यक आहे. ...

६३ पन्ना कापडासाठी १३ पैसे मजुरीवाढ
असोसिएशनच्या बैठकीत निर्णय
इचलकरंजी : एअरजेट लूमवर तयार होणाऱ्या ६३ पन्ना कापडासाठी किमान १३ पैसे मजुरीवाढ मिळणे आवश्यक आहे. त्याची अंमलबजावणी नववर्षापासून सुरू व्हावी, या दरनिश्चित मजुरीपेक्षा कमी दरात बिमे घेतल्यास संबंधितांकडून ५० हजार रुपये दंड आकारला जाईल, असा निर्णय एअरजेट लूम ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत झाला.
सूत दरामध्ये वाढ होत चालल्याने कापडाला योग्य तो दर मिळत नसल्याने यंत्रमागधारक हतबल झाले आहेत. नुकसान सोसूनही हा व्यवसाय चालवावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली. दरम्यान, क्वॉलिटीनुसार कारखानदारांना वैयक्तिक पातळीवर जादा आकारण्याची मुभा दिली आहे. बैठकीस अशोक व्यास, प्रकाश गौड, नरेंद्र कनोजे, सुशील मगदूम, सुभाष बलवान, नागेश बोनगे यांच्यासह यंत्रमागधारक उपस्थित होते.